शिवसेना आमदार संजय शिरसाट हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना फुटीनंतर संजय शिरसाट यांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी दिली होती. त्यावेळी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. मागील अडीच-तीन वर्षांत त्यांनी विरोधकांना अंगावर घेतलं.अनेकदा भाजप नेत्यांनाही त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. त्याचं बक्षिस म्हणून मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मागील टर्ममध्ये ते मंत्रिपदासाठी इच्छूक होते. अनेकदा त्यांना मंत्रिपदाबाबतची इच्छा बोलूनही दाखवल होती. मात्र मंत्रिपदाऐवजी सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे निकटवर्तीय मानले जातात.
(नक्की वाचा- Narhari Zirwal : सरपंच, आमदारकीची हॅटट्रिक आता मंत्री... नरहरी झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द)
संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी 16 हजारांहून अधिक मतांनी ते विजयी झाली आहेत. संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या राजू शिंदे यांचा पराभव केला आहे.
(नक्की वाचा- शिंदेंचे मंत्रिमंडळातील शिलेदार ठरले; शिवसेनेकडून हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, 3 मंत्र्यांना डावललं)
संजय शिरसाट यांची राजकीय कारकीर्द
- पहिल्यांदा 2000 साली संभाजीनगर महानगरपालिकेत नगरसेवक
- पुढे 2001 मनपा सभागृहनेता
- 2009 साली पहिल्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार
- 2014 साली दुसऱ्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार
- 2019 साली तिसऱ्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार
- 2014 साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अध्यक्ष
- 2024 मध्ये सिडकोचे अध्यक्ष
- 2024 साली चौथ्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world