अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी घोषणा, 14 तारखेला बारामतीमध्ये काय होणार?

Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईत सोमवारी झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईत सोमवारी झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत या पक्षाचा एकच खासदार निवडून आला आहे.  लोकसभेतील या पराभवानंतर पक्षासाठी आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबरोबर बारा जुलै रोजी होणारी विधानपरिषद निवडणुकीत पक्षाची परीक्षा होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईत झाली.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बारामतीमध्ये शक्तीप्रदर्शन

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 14 जुलै रोजी बारामतीमध्ये भव्य सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या बैठकीनंतर बोलताना दिली. इतिहासात आजवर कधीही झाली नाही, अशी सभा घेऊ असं तटकरे यांनी जाहीर केलं. बारामती लोकसभा निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत सुप्रीया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार आणि पक्षाचे नेते पहिल्यांदाच बारामतीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत ते काय बोलणार? विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार का? महायुतीमधील वाद, आरक्षणाचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीतील बारामतीकरांचा कौल या सर्व विषयांवर अजित पवार होमग्राऊंडवर काय भूमिका मांडणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर अवघ्या दोन दिवसांनी ही सभा होत असल्यानं या सभेला मोठं महत्त्व आहे. 

नक्की वाचा : विधानपरिषद निवडणूक : महायुतीची मतं फोडण्यासाठी पवार रिंगणात, मोठा नेता गळाला लागणार? 
 

अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला आहे. सरकारच्या सर्व योजना जनतेपर्यंत नेणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

Advertisement

राष्ट्रवादीकडून खबरदारी 

आगामी विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर उद्या (मंगळवार, 9 जुलै) रोजी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषद निवडणुकीला मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही जय्यत तयारी सुरु केलीय. निवडणुकीच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार आहे. राष्ट्रवादीचे या निवडणुकीत 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर या पक्षाकडं हक्काची 43 मतं आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला आणखी 3 मतांची आवश्यकता आहे. 

( नक्की वाचा : 'तुम्ही जे पेरलं ते उगवलं' बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा )