जाहिरात

'तुम्ही जे पेरलं ते उगवलं' बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा

Beed MP Bajarang Sonawane Speech : बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी सत्कार कार्यक्रमात पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा साधला.

'तुम्ही जे पेरलं ते उगवलं' बजरंग सोनावणेंचा पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा
Bajarang Sonawane Speech
केज, बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

Beed MP Bajarang Sonawane Speech : बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांचा आज (सोमवार, 8 जुलै) केजमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर सोनवणे पहिल्यांदाच केजमध्ये आले होते. त्यावेळी त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. मोठमोठे बॅनर,कमानी लावत त्याचबरोबर फटाके अन तोफांची आतिषबाजी,जेसीबीनी फुलांची उधळण  करण्यात आली.यावेळी सोनवणे यांची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली. डीजेच्या तालावर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सोनावणे यांचा सत्कार झाला. 

संपूर्ण राज्यात बीड लोकसभा मतदारसंघाची लढत लक्षवेधी ठरली. शेवटपर्यंत अटीतटीनं रंगलेल्या या लढतीमध्ये सोनावणे यांनी भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. बीड लोकसभा हा भाजपा बालेकिल्ला मानला जात होता. त्यातच पंकजा मुंडे यांना त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांचाही पाठिंबा होता. पण, बजरंग सोनावणे यांनी या निवडणुकीत विजय मिळवत अनेक राजकीय निरिक्षकांचे अंदाज चुकवले.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले सोनावणे?

केजमधील सत्कार समारंभात सोनावणे यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांना दिलं. या सत्कार कार्यक्रमात बोलताना सोनावणे यांनी चौफेर फटकेबाजी करत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं. 

'बार्शीपासून जागोजागी सत्कार झाल्याने मला इथे यायला वेळ लागला,सत्कार करत असताना महिलांनी सांगितलं की निकालाच्या दिवशी स्वयंपाक केला नाही पण संपूर्ण निकाल बघितला. मी शपथ घेण्याच्याआधी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या प्रकारची बैठक घेणारा मी पहिलाच खासदार असेल, 'असं सोनावणे म्हणाले. 

( नक्की वाचा : 'पंकजा मुंडेंना पहिल्यांदाच धोका दिला', शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची Audio Clip Viral )

विरोधकांवर निशाणा

बजरंग सोनावणे यांनी या भाषणात विरोधकांवर जोरदार निशाणा साधाला. 'माझाही यापूर्वी पराजय झालाय. पण, मी कधी कुणाला नावं ठेवली नाहीत. 'जो देगा उसका भला, जो ना दे उसकाभी भला' असं माझं तत्व आहे. देवगाव,वडमाऊली, दहिफळ या वंजारी बहुल गावांनाही मला मतदान केल आहे. काय करायचय ते करा पण ताईना मतदान करा असे आदेश होते. सिरसाळ्याला ज्या कॉलेजच्या मैदानात प्रचारसभा झाली ते कॉलेज बंद करा असे म्हणत आहेत हे चालणार नाही.

Latest and Breaking News on NDTV

तुम्ही बोगस मतदान केले,दादागिरी केली,बूथ ताब्यात घेतले तरीही तुम्हाला 74834 ची आघाडी परळी मतदारसंघात घेता आली नाही. मला बीड विधानसभा मतदारसंघात दीड लाखांपेक्षा जास्त आघाडी मिळाली. मला सर्व जाती धर्माने मतदान केलं. तुम्ही जे पेरलं ते उगवलं. दर चार महिन्याला निवडणूक असते,तुमची घमेंड उतरत नाही,' या शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. 

( नक्की वाचा : 'वडीगोदरीमध्ये पाहा, वाह रे वाह', पंकजा मुंडे यांचा इशारा कुणाकडं? )

विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप

बीड जिल्ह्यात सहापैकी सहा आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणायचे आहेत. बजरंग सोनावणे खासदार झाला हे मान्य करा. मी तुमच्या  मी तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारच आहे.खासदार काय असतं हे दाखवून देणार आहे.पुढचे दोन महिने सोसा आपलच सरकार येणार आहे, ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून नेता होत आलं पण प्रगतशील जिल्ह्याचे नेते व्हायचा प्रयत्न करा असा टोला सोनावणे यांनी लगावला. 

'सरकारने माझ्या शेतकऱ्यासाठी काय काम केलं? लाडकी बहीण योजना इतके दिवस का केलं नाही,कांद्याला अनुदानही दिले नाही. लोकसभेत आम्ही काय बोललो हे दाखवलं जात नाही कॅमेरा त्यांच्याच लोकावर असतो.संसदेत राहुल गांधीच्या बाकामागे उभा राहून बोलणारा खासदार बजरंग सोनवणे आहे.राहुल गांधी देशाचे पंतप्रधान लवकरच होतील बजरंग सोनवणे म्हणाले.देशाच्या सर्व पक्षासोबत कसे संबंध असावेत हे दाखवून देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आहेत,' असं सोनावणे यांनी सांगितलं. 

सत्कार कार्यक्रमात वेळ नको

माजी मंत्री अशोक पाटील या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सत्कार समारंभात वेळ घालू नका असे म्हणत खासदार सोनवणे यांची कानउघाडणीच केली.मी कधी सत्कार समारंभात जात नाही पण आज इथं आलो आहे.रेल्वे,रस्ते असे अनेक प्रश्न जिल्ह्यासमोर आहेत.शक्ती जनतेत आहे हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राहुल गांधी,शरद पवार यांनी संघर्ष केला म्हणूनच केंद्र सरकारला काही प्रमाणात रोखले असल्याचं पाटील यांनी सांगितलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com