विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागलेले असते. त्यात शिवसेन आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अनेक घडामोडी घडत आहेत. आता अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पवार हे जुन्नर विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बेनके यांनी शरद पवारांच्या स्वागतासाठी जागोजागी मोठमोठे फ्लेक्स उभे केले आहेत. या फ्लेक्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे या फ्लेक्सवर फक्त शरद पवारांचा फोटो आहे. अजित पवारांच्या फोटोला कोणतीही जागा यावर देण्यात आलेली नाही. त्यामुळे बनके शरद पवारांकडे जाणार या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार आणि अजित पवार हे विधानसभेपुर्वी एकत्र येऊ शकतात. असे विधान अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या मनात काही तरी वेगळं सुरू आहे याची कुणकुण सर्वांनाच लागली होती. आता थेट शरद पवारांच्या स्वागतासाठी त्यांनी फ्लेक्स झळकवले आहेत. रविवारी जुन्नर विधानसभेत शरद पवार आले. त्यांचं स्वागत बेनकेंनी केलंय. इतकंच नव्हे तर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहचले, तेंव्हा स्वतः बेनके तिथं हजर होते.
ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती
बेनकेंनी गेल्या महिन्यात खासदार अमोल कोल्हेच्या घरात ही शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी राजकारणात काहीही घडू शकतं, पवार काका-पुतणे विधानसभे पुर्वी एकत्र येऊ शकतात. असे सूतोवाच बेनकेंनी केले होते. त्यानंतर पवार पुन्हा एकदा जुन्नर विधानसभेत आले होते. त्याच वेळी बेनकेंनी त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे फलक झळकवले. येवढेच नाही तर पवारांची भेटही त्यांनी घेतली. यावेळी त्यांची पवारांसोबत काही चर्चा झाली का? याबाबतची कोणती ही माहिती बाहेर आलेली नाही. मात्र यानिमित्ताने बेनकेंच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? अशी चर्चा जुन्नर विधानसभेत रंगलेली आहे.
ट्रेंडिंग बातमी - लखपती दीदींसाठी मोदी आज जळगावात, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत अखेर पूर्णविराम!
अतुल बेनके हे जुन्नर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांनी 2019 साली इथून निवडणूक लढून विजय मिळवला होता. युतीच्या ताब्यात असलेली ही जागा त्यांनी खेचून आणली होती. बेनके कुटुंब हे शरद पवारांच्या जवळचं मानलं जातं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अतुल बेनके यांनी अजित पवारांची साथ देण्याचे ठरवले.मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बेनके यांनी अमोल कोल्हेंना मदत केल्याची चर्चा आहे. शिवाय पवारांनीह त्यानंतर बेनके यांच्या घरी भेट दिली होती. त्याच वेळी पडद्यामागे काही तरी घडत असल्याचे दिसून येत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world