धर्मवीर 2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आनंद दिघेंची हत्या झाली की खरोखर त्यांना ह्रदविकाचा झटका येवून त्यात त्यांचा मृत्यू झाला याची चर्चा रंगली आहे. त्यात भर म्हणून की काय शिवसेने शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक खळबळ जनक दावा केला आहे. आनंद दिघेंची हत्या झाली होती. याबाबत अनेक तर्क ठाण्यात सांगितले जातात. अशा वेळी याची चौकशी झाली पाहीजे. त्यातून सत्य काय आहे हे बाहेर येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही हत्या की आणखी काही याची चौकशी करावी अशी मागणीच त्यांनी केली आहे. त्यांनी हत्या झाली आहे हा केलेल्या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होवू शकतो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आनंद दिघेंची हत्या झाली आहे हे सर्व ठाण्याला माहित आहे असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या हत्येबाबत अनेक स्टोरी चर्चील्या जातात. त्यांचा अपघात झाला होता. त्यात त्यांच्या ना डोक्याला मार होता ना कुठे गंभिर दुखापत झाली होती. ना ते सिरीअस होते. त्यांचा बीपी आणि शुगरही बरोबर होती. अशा वेळी अचानक हार्टअटॅक त्यांना कसा आला? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. त्याचे उत्तर अजूनही शिवसैनिकांना मिळाले नाही. याबाबत अनेक तर्क आहेत असे शिरसाट म्हणाले.
दिघेंच्या पायाला मार लागला होता. काही ठिकाणी जखमा होत्या. पण त्यांची तब्बेत नॉर्मल होती. त्यांना सोडलं जाणार होतं. दिघे ही त्यावेळी बरे होते. असं काही होईल अशी शंकाही कोणाच्या मनात आली नव्हती. अशा वेळी त्यांनाचा मृत्यू झाला. धर्मवीरच्या पहिल्या भागातही त्यांचा मृत्यू झालानसून त्यांचा खून करण्यात आल्याचं सांगितलं होतं. पण ही वस्तूस्थिती काय आहे हे समजले पाहीजे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे. अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. सत्य काय आहे हे सर्वांच्या समोर यायलाच पाहीजे असेही ते म्हणाले.
ठाण्यावर आनंद दिघेंची चांगली पकड होती. त्यांच्या शब्दाला मान होता. ठाण्यात त्यांचे एक हाती वर्चस्व होते. ठाणे बंद म्हणजे बंद अशी स्थिती होती. त्यांच्या शब्दा पुढे कोणी नव्हते. त्यांचे हेच वर्चस्व काहींना खटकत होते. त्यांना दिघेंची वाढलेली ताकद आवडत नव्हती. दिघेंची वाढणारी ताकद काहींच्या पचनी पडत नव्हती. त्यामुळेच त्यांचा घात झाला असावा असे मतही शिरसाट यांनी व्यक्त केले. त्यामुळेच या संपुर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. सत्य काय आहे हे शिवसैनिकांना समजणे त्यांचा अधिकार आहे असेही ते म्हणाले.
ज्या वेळी आनंद दिघेंचा अपघात झाला, त्यानंतर त्यांना सिंघानीया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर या हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर हे हॉस्पिटल बंद झाले. ते पुढे कधीही सुरू झाले नाही. असे का झाले असा प्रश्नही शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. एखादी घटना घडली तर पाच दिवस, दहा दिवस हॉस्पिटल बंद राहू शकते. पण ते कायमचेच बंद कसे काय झाले? त्यात काही तरी पाणी मुरत आहे असा संशयही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world