जाहिरात

Malegaon sugar factory election result 2025: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कोण जिंकलं ?

Malegaon sugar factory election result 2025: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कोण जिंकलं ?
बारामती:

देवा राखुंडे

Malegaon sugar factory election result 2025: बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे निकाल बुधवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले. या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीचे मतदान 22 जून रोजी म्हणजेच रविवारी पार पडले होते. मंगळवारी म्हणजेच 24 जून रोजी या निवडणुकीत पडलेल्या मतांच्या मोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत पहिला निकाल अजित पवारांचा लागला होता.  ब' वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन या जागेवर अजित पवार मोठ्या फरकाने निवडून आले. (Ajit Pawar wins Malegaon Sugar Mill seat in Baramati) अजित पवार हे नीळकंठेश्वर पॅनेलतर्फे निवडणूक लढवत होते आणि त्यांना 91 मते मिळाली. अजित पवार यांनी  बळीराजा पॅनेलच्या भालचंद्र देवकाते यांचा पराभव केला. देवकाते यांना फक्त 10 मते मिळाली. 

(नक्की वाचा: अजित पवारांच्या पॅनलची हॅटट्रिक; सुरुवातीच्या निकालात मोठी आघाडी)

आतापर्यंत किती जागांचे निकाल लागले ?

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी एकूण 21 जागा होत्या आणि त्यासाठी एकूण 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल (Nilkantheshwar Panel), शरद पवारांचे बळीराजा सहकार बचाव पॅनेल (Baliraja Sahakar Bachao Panel), भाजप नेते चंद्रराव आणि रंजन तावरे यांचे  (Sahkar Bachao Shetkari Panel) आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल अशी चार पॅनेल ही निवडणूक लढवत होती. मात्र यातील मुख्य लढत ही नीळकंठेश्वर आणि सहकार बचाव शेतकरी पॅनेलमध्ये झालेली पाहायला मिळाली.

क्रमांकविजयी उमेदवार आणि त्याचे पॅनेलपराभूत उमेदवार आणि त्याचे पॅनेलजागा/मतदारसंघ
1अजित पवार (निळकंठेश्वर पॅनेल)भालचंद्र देवकाते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 'ब' वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन
2रतनकुमार साहेबराव भोसले(श्री निळकंठेश्वर पॅनल)बापूराव आप्पा गायकवाड (सहकार बचाव शेतकरी पॅनल)अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
3नितीन वामनराव शेंडे (श्री निळकंठेश्वर पॅनल) रामचंद्र कोंडीबा नाळे (सहकार बचाव पॅनल) इतर मागासवर्गीय प्रवर्ग 
4विलास ऋषिकांत देवकाते(श्री निळकंठेश्वर पॅनल)सूर्याजी तात्यासो देवकाते (सहकार बचाव शेतकरी पॅनल)  भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग
5

संगीता बाळासाहेब कोकरे(श्री निळकंठेश्वर पॅनल),

ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 

राजश्री बापूराव कोकरे(सहकार बचाव शेतकरी पॅनल) महिला राखीव मतदारसंघ 
6शिवराज जाधवराव (श्री निळकंठेश्वर पॅनल),
बाळासाहेब तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल),
राजेंद्र बुरुंगले ( श्री निळकंठेश्वर पॅनल).
रंजनकुमार तावरे (सहकार बचाव शेतकरी पॅनल),
संग्रामसिंह काटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) ,
रमेश गोफणे (सहकार बचाव शेतकरी पॅनल).
माळेगाव गट क्रमांक एक सर्वसाधारण ऊस उत्पादक 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com