जाहिरात

Vidhan Parishad: विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, 'हे' आहेत 6 उमेदवार

भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधान परिषदेत जाण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. पण या सहा जणांना संधी मिळाली आहे. 

Vidhan Parishad: विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, 'हे' आहेत 6 उमेदवार
मुंबई:

विधान परिषदेसाठी भाजपच्या सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनिल कर्जतकर आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधान परिषदेत जाण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. पण या पाच जणांना संधी मिळाली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

विद्यमान आमदारां पैकी एकाला संधी देण्यात आलेली नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना मात्र संधी देण्यात आली आहे. त्यांच्याच जागेवर होत असलेल्या पोटनिवडणूकीसाठी त्या आता भाजपच्या उमेदवार असतील. बाजी पाच चेहरे हे नवीन आहेत. जुन्या चेहऱ्यांना संधी मिळाली नाही. पुन्हा एकदा केशव उपाध्ये आणि माधव भांडारी यांच्या पदरी निराशा आली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com