'फडणवीसांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील'

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी जनता आहे. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

राजकारणात एक तर मी राहीन नाही तर फडणवीस राहातील असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यानंतर राजकारण आता पेटले आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर या वक्तव्यानंतर जोरदार हल्ला चढवला जात आहे.   देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी जनता आहे. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.शिवाय भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ही ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

देवेंद्र फडणवीस यांच्या मागे जनता आहे असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यामुळे त्यांचे राजकारण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील असे बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केले होते असा आरोपही त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरेंचा अहंकार जनता जनार्दन उतरविल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'राजकारणात एक तर मी राहीन, नाहीतर फडणवीस राहतील'

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, त्यामुळे घाम फोडण्याची भाषा हस्यास्पद आहे असे ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी  देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला. तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला. आता त्यांना संपवीण्याची अहंकारी भाषा करताहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावं, तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपविल्याशिवाय राहणार नाही असे बावनकुळे म्हणाले. फडणवीसांच्या पाठीशी जनता आहे. परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील असा पलटवारही बावनकुळे यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंची मराठा आरक्षणावर रोख 'ठोक' भूमिका, कोणाची पंचाईत होणार?

बावनकुळे यांच्या पाठोपाठ महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही ठाकरेंवर टिकेची झोड उठवली. फडणवीस यांच्या नावाची कावीळ झालेले अनेक कावीळग्रस्त सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत आहेत. त्यातील एक उद्धटपंत तुम्ही आहात, असा उल्लेख वाघ यांनी केला आहे. हिंदुत्व सोडून आणि वडिलांच्या विचारांशी प्रतारणा करून, तुम्ही दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्ता उबवली. पण, उसने कर्तृत्व फार काळ टिकले नाही. सत्तेवर असताना  घरी बसलात, सत्ता गेल्यावर तर कायमचे घरी बसणे नशिबी आले, अशी टिका त्यांनी केली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मोठा धक्का; पोलीस भरतीत EWS अंतर्गत मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती  

ऊठसूठ फडणवीसांवर गरळ ओकण्यासाठी एकाला तुम्ही कायमचे पाळलेले आहेच. त्याने पक्षाचे वाटोळे केले, तरी तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्दैव! त्याच्या पावलावर पाऊल टाकत तुमची 'विनाशकाले विपरीत बुद्धी' झाली आहे असे त्या म्हणाल्या. शिवाय उद्धटपंत उल्लेख करत भ्रामक कल्पनेत वावरू नका, वास्तवाला सामोरे जा. तुम्ही म्हणता ते एकदम मान्य. महाराष्ट्रातील जनताच म्हणू लागली आहे,आम्हाला  देवेंद्रजी पाहिजेत, बाकी सब झूठ हैं ! अशी प्रतिक्रीया वाघ यांनी दिली आहे.