श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात महायुतीमध्ये कुरबुरी सुरू, कल्याण-डोंबिवलीतील 5 जागांवर भाजपचा दावा, मित्र पक्षाला डिवचण्यासाठी शिवसेनेची बॅनरबाजी

भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, आमदार यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली.

Advertisement
Read Time: 2 mins
कल्याण:

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहे. भाजपकडून कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ मथील पाच विधानसभात मदरास संघावर दावा ठोकण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने अप्रत्यक्षरित्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांना डिवचणारा बॅनर लावला आहे.

कल्याण पूर्वेत राजकारण हे अत्यंत विखारी वळणावर आले असल्याचे पोलीस स्टेशनमध्येच झालेल्या गोळीबारावरून दिसून आले होते. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.  आमदार गायकवाड हे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी सध्या जेलमध्ये आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून भाजप आमदार गायकवाड हे जामिनावर जेलमधून कधी सुटणार याची भाजपला प्रतिक्षा आहे.

Advertisement

भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, आमदार यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली. 28 जुलै रोजी होणाऱ्या पक्षाच्या जिल्हा अधिवेशनासंदर्भात माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, आमच्याकडून कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि अंबरनाथ या विधानसभा मतदार संघांकरीता तयारी सुरु आहे. 'आमच्या पक्षाचा उमेदवार दिला तर तो शंभर टक्के निवडून येणार. मित्र पक्षाचा उमेदवार आला तरी आम्ही मदत करणार. मात्र या पाचही विधानसभा मतदार संघावर आमचा दावा आहे.' असे सूर्यवंशी यांनी म्हटले.  या जागांसंदर्भात वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असेल असे त्यांनी म्हटले. वरिष्ठ जर निर्णय घेतील तो मान्य असेल तर त्याआधीच 5 मतदारसंघांवर दावा का सांगण्यात आला अशी चर्चा कल्याण-डोंबिवलीत सुरू आहे. हे दबावाचे राजकारण असल्याचे बोलले जाते.  या पाच विधानसभा मतदार संघापैकी कोणत्या पक्षाकडे कोणता मतदारसंघ आहे ते पाहूया.

Advertisement
  • डोंबिवली- रवींद्र चव्हाण, भाजप
  • कल्याण पूर्व - गणपत गायकवाड
  • कल्याण पश्चिम- विश्वनाथ भोईर, शिवसेना शिंदे गट
  • अंबरनाथ- बालाजी किणीकर, शिवसेना शिंदे गट
  • कल्याण ग्रामीण- राजू पाटील, मनसे

लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेला मदत केली होती. आता भाजपने त्यांच्या मतदारसंघावरही दावा हा महायुतीला मदत करणारे मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे आहे. मात्र भाजपने या पाचही जागांवर करीत महायुतीत पेच निर्माण केला आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.एकीकडे भाजपने हा दावा केला असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विशाल पावशे यांनी कल्याण पूर्वेत बॅनर लावलेत. 'नवीन पर्व की जुनाच कल्याण पूर्व' असं या बॅनर वर लिहिण्यात आले आहे. हा बॅनर कल्याण पूर्वेचे आमदार गणपत आमदार गायकवाडांना डिवचण्यासाठी लावला असावा अशी चर्चा आहे.

Advertisement

Topics mentioned in this article