पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीपुढे उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या इंडी आघाडीचा निभाव लागत नाही. त्यामुळे संविधान बदलाच्या अफवा पसरवण्याचं काम ते करत आहेत. काँग्रेसनं एक दोन वेळा नाही तर 80 वेळा घटना बदलली पण उद्धव ठाकरे त्यावर मूग गिळून गप्प बसले आहेत, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आलं तर संविधान बदलणार, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या आरोपांना बावनकुळे यांनी ट्विट करत उत्तर दिलंय.
काँग्रेस हिंदुंची संपत्ती काढून मुस्लिमांना देणार, यावर उद्धव ठाकरे गप्प का? सोनिया सेनेच्या भीतीपोटी उद्धव ठाकरे किती हिंदूविरोधी भूमिका घेणार? असा थेट सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. राज्यात 48 लोकसभेच्या जागा जिंकणार हा उद्धव ठाकरे यांचा दावा हास्यास्पद आहे, असा टोलाही त्यांनी या पोस्टमध्ये केलाय.
( नक्की वाचा : आदित्य ठाकरे मुख्यमंत्री? उद्धव यांच्या 'त्या' दाव्याला फडणवीसांकडून उत्तर )
चंद्रशेखर बावनकुळे यांची संपूर्ण पोस्ट
उबाठा उर्फ नकली शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात 48 लोकसभा जिंकणार असा हास्यास्पद दावा केला. एवढंच नाही तर संविधान बदलणार ही खोटी बोंबही ठोकली.
मुळात मोदीजींच्या गॅरेंटीपुढे उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या इंडी आघाडीचा निभाव लागत नाही. त्यामुळे संविधान बदलाच्या अफवा पसरवण्याचं काम ते करत आहेत. काँग्रेसनं एक दोन वेळा नाही तर 80 वेळा घटना बदलली पण उद्धव ठाकरे त्यावर मूग गिळून गप्प बसले आहेत.
एवढंच नाही तर बहुजन हिंदुंची संपत्ती काढून अल्पसंख्याक मुस्लिमांना देणार असं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय. पण यावर उद्धव ठाकरे चकार शब्द काढायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे सोनिया सेनेच्या भीतीपोटी किती हिंदूविरोधी भूमिका घेणार?
उबाठा उर्फ नकली शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात ४८ लोकसभा जिंकणार असा हास्यास्पद दावा केला. एवढंच नाही तर संविधान बदलणार ही खोटी बोंबही ठोकली.
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 24, 2024
मुळात मोदीजींच्या गॅरेंटीपुढे उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या इंडी आघाडीचा निभाव लागत नाही. त्यामुळे संविधान बदलाच्या अफवा…
यापूर्वी, राज्यघटनेत बदल करण्याची भाजपाची योजना असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. राज्यघटनेत बदल करण्यासाठी भाजपाला लोकसभेत 400 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. त्यानंतर देशात निवडणुका होणार नाहीत. भाजपाला देशाचा विकास करण्यासाठी नाही तर राज्यघटनेत बदल करण्यासाठी 400 जागा हव्या आहेत, अशी टीका उद्धव यांनी केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world