जाहिरात

'...तर आमच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता' भाजप आमदार असं का म्हणाला?

आमदार निवासात झालेल्या एका थरारक घटनेचे कथन आमदार हरिष पिंपळे यांनी विधानसभेत केले. त्यांनी केलेल्या कथनाने सर्वांच्याच अंगावर काटा आला.

'...तर आमच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता' भाजप आमदार असं का म्हणाला?
मुंबई:

आकाशवाणी आमदार निवासात झालेल्या एका थरारक घटनेचे कथन आमदार हरिष पिंपळे यांनी विधानसभेत केले. त्यांनी केलेल्या कथनाने सर्वांच्याच अंगावर काटा आला. शिवाय आमदार आमदार निवासातच सुरक्षित आहेत का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला. पिंपळे यांनी आकाशवाणी आमदार निवासात असलेल्या लिफ्टमुळे कसा एकाच जिव गेला असता याचेच कथन केले. शिवाय आज आमच्या श्रद्धांजलीचाच कार्यक्रम घ्यावा लागला असता असेही ते रागाने म्हणाले. त्यांनी सांगितलेली हकीगत ऐकून विधानसभा अध्यक्षांनीही झालेल्या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )   

आकाशवाणी आमदार निवासात काय घडलं? 

एमआयडीसीसाठी आयोजित केलेली बैठक आटपून आमदार हरिष पिंपळे हे आपल्या आकाशवाणी आमदार निवासात गेले. या आमदार निवासात चार लिफ्ट आहेत. त्यातल्या दोन या आमदारांसाठी तर दोन कार्यकर्त्यांसाठी आहेत. त्यातल्या एका लिफ्ट मधून आमदार पिपंळे हे पुढे गेले. त्यांचे पीए आणि कार्यकर्ते दुसऱ्या लिफ्टने येत होते. पण ती लिफ्ट मधीच बंद झाली. एकूण सात जण त्या लिफ्टमध्ये अडकले. काही केल्या लिफ्ट सुरू होत नव्हती. त्यात लिफमनला अटॅक आल्याचा दावा पिंपळे यांनी केला आहे. त्याला उलटीही झाली.तो बेशुद्धही झाला. पाऊण तास लिफ्ट सुरू होती. त्यानंतर हे सर्व जण बाहेर आले. त्या लिफ्टमध्ये एखादा आमदार अडकला असता. किंवा त्या लिफ्टमध्ये आपण असतो तर काय झाले असते असा संतप्त सवाल त्यांनी विधानसभेत केला. आपल्याही जीवाचं काही तरी बरं वाईट झालं असतं. शिवाय यात विधानसभेत आम्हाला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला असता असेही ते म्हणाले. 

(नक्की वाचा- कोणत्या महिलांना मिळणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ)

विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले? 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेची गंभीर पण दखल घेतली आहे. अशी घटना घडणे हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. लिफ्टसाठी लागणारे पार्ट्स हे ड्युप्लिकेट लावले असतील, तर ज्यांनी कोणी हे केले आहे त्यांच्यावर कारवाई केली जावी असेही ते म्हणाले. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत आता 'या' कागदपत्रांची नाही गरज 

मनोरो आमदार निवास कधी होणार? 

आकाशवाणी आमदार निवासाची दुर्दशा काय आहे हेच आमदार हरिष पिंपळे यांनी मांडले. शिवाय आता तरी मनोरा आमदार निवास लवकरात लवकर आमदारांसाठी खुले करावे अशी मागणी त्यांनी केली. शिवाय ते कधी पर्यंत आमदारांना मिळेल अशी विचारणाही त्यांनी केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोर आमदार निवासाचे काम जोरदारपणे सुरू असल्याचे सांगितले. दिलेल्या वेळेत ते पुर्ण होईल असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय मॅजेस्टिक आमदार निवासाच्या कामालाही गती देण्यात येणार असल्याचे सांगत आमदारांच्या राहण्याचा प्रश्न मिटेल असे ते म्हणाले.   
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com