जाहिरात

नवी मुंबईत टांगा पलटी अन् घोडे फरार, भाजपच्या बाजूने निकाल लागताच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा व्हिडीओ व्हायरल

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी घेतली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजप-66,शिवसेना-42, शिवसेना (UBT)-2, मनसे-1 जागा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशातच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय.

नवी मुंबईत टांगा पलटी अन् घोडे फरार, भाजपच्या बाजूने निकाल लागताच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा व्हिडीओ व्हायरल
Navi Mumbai Election 2026 Result
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Municipal Corporation Election 2026 Result : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी घेतली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजप-66,शिवसेना-42, शिवसेना (UBT)-2, मनसे-1 जागा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून एकनाश शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यात शीतयुद्ध सुरु होतं. राज्यात महायुतीची सत्ता असतानाही शिंदे-नाईक असा राजकीय संघर्ष रंगला होता. अशातच आज नवी मुंबईच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. कारण गणेश नाईकांचा घोडे सवारीचा जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

गणेश नाईकांचा घोडे सवारीचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत प्रचारादरम्यान करण्यात आलेल्या “टांगा पलटी” या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर हा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आल्याने विविध तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.सोशल मीडियावर या व्हिडीओला थेट सध्याच्या राजकारणाशी जोडलं आहे. नाईकांच्या समर्थकांनी या व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांना अप्रत्यक्षरित्या डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नक्की वाचा >> BMC Elections : निशिकांत दुबे राज ठाकरेंची भेट घेणार, 'पटक-पटक कर मारूंगा' चॅप्टर संपवणार, ट्वीटमुळे खळबळ!

नवी मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग

तर काहींनी हा व्हिडिओ जुना आहे असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींशी या व्हिडीओचा थेटसंबंध नसल्याचंही काही लोकांचं म्हणणं आहे. दरम्यान, या व्हिडिओवरून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. निकालानंतर नवी मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला असून, पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झालं आहे.

नक्की वाचा >> मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देणाऱ्या 'लेडी ओवैसी' आहेत तरी कोण? मुस्लिमांसाठी बनल्या रणरागिनी, "ऐका फडणवीस.."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com