
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो सध्या प्रकाशित करण्यात आला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या विषयांवर सडेतोड पणे बोलले दिसत आहेत. ते मुलाखतीत राज ठाकरे, एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि विधानसभेतील पराभवाचे कारण यावर बोलताना दिसत आहेत. शिवाय एकनाथ शिंदेंचे 50 पेक्षा जास्त आमदार कसे निवडून आले यावरही ठाकरे शैलीत उत्तर दिले आहे. त्याचा या मुलाखतीचा पहिला भाग 19 जुलैला प्रदर्शित होणार आहे.
या मुलाखतीला ब्रँड ठाकरे अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. संजय राऊत यांचा पहिलाच प्रश्न हा ठाकरे वारे काही हटत नाहीत, ते काही ठंड पडत नाहीत असे विचारताना दिसत आहे. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणतात, सदासर्वदा ठाकरे म्हणजे संघर्ष. संघर्ष 'मतलबी' वाऱ्यांसाठी नाही तर समाजासाठी आहे. असं ते या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहेत. पुढे ते शिवसेने बद्दल सांगताना दिसत आहेत. माझे आजोबा, बाळासाहेब, मी आदित्य आणि आता राजही सोबत आला आहे. असं म्हणत त्यांनी मनसे बरोबरच्या युतीबाबत सुचक संकेत पुन्हा एकदा दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह ही देण्यात आलं त्यावरही उद्धव यांनी भाष्य केलं आहे. राऊत यांनी प्रश्न विचारला
माझी शिवसेना खरी. माझं चिन्ह खरं असं सांगत डुप्लिकेट शिवसेना भाजपमध्ये विलिन करायला काही जण निघाले आहेत. त्याला ही ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं नाव धोंड्या ठेवलं तर? असा ते या प्रश्नाला उत्तर देताना प्रतिप्रश्न करताना दिसत आहेत. माझं नाव बदललं तर मी त्याचं नाव धोंड्याच ठेवणार असं ते बोलताना दिसत आहे.
त्यानंतर राऊतांचा प्रश्न पंतप्रधान मोदींवर होता. मोदी या विष्णूच्या अवतारान लोकसभेत बहुमत गमावणं याचा अर्थ तुम्ही काय घेता. त्या प्रश्नालाही ते उत्तर देताना दिसले आहेत. देशात अस्तिरता ठेवण्याचं काम भाजप करत आहे. तोडा फोडा झोडा आणि राज्य करा अशी भाजपची भूमीका आहे. ते जनतेला सतत चिंताग्रस्त ठेवण्याचं काम करत आहेत असं उद्धव या मुलाखतीत बोलताना दिसत आहे. लोकसभेनंतर विधानसभेत मात्र पराभव झाला हे सहा महिन्यात कसं झालं या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं आहे. त्यावर ते म्हणतात, लोकसभेत लढताना आपले पणा होता. काही झालं तरी आपला निवडून यायला पाहिजे ही भावना होती. पण विधानसभेला आपले पणा गेला. मी पणा आला. त्यामुळे पराभव झाला असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री असताना तुम्ही अनेक कामे केले पण त्याची कधी तुम्ही पिपाणीही वाजवली नाही अशी विचारणा राऊत यांनी केली. उलट सध्याचं सरकार हे कधी न केलेल्या कामाचा डंका वाजवत आहे असं ही ते म्हणाले. त्यावर उद्धव म्हणाले मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. त्यात कर्जमाफीचा निर्णय होता. कोरोनात चांगले काम झाले. शीव भोजन थाली दिली. यावर राऊत म्हणाले असं असतानाही शिंदे गटाला विधानसभेत 50 पेक्षा जास्त जागा कशा मिळाल्या. हा जादूटोना आहे का? त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले,कदाचित त्यांनी त्यासाठी डायनासोर कापला असेल. त्यावर संजय राऊत हसताना दिसत आहे. ही संपूर्ण मुलाखत 19 जुलैला पाहाता येणार आहे. ही मुलाखत दोन भागात असेल. त्याचा पहिला भाग 19 जुलैला प्रदर्शित होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world