सख्खा भाऊ ज्यांना समजला नाही त्यांना 'लाडकी बहीण' काय समजणार? शिंदेंचे ठाकरेंवर बाण

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भावांसाठी काय? असा प्रश्न केला होता. याला शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जोरदार उत्तर दिले. उत्तर देतांना त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकेचे बाण सोडले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भावांसाठी काय? असा प्रश्न केला होता. याला शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. शिवाय ठाकरेंच्या कार्यकाळात काय झालं याचाही पाडा त्यांनी वाचला. शिवाय आपलं सरकार पाडण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार पडलं नाही पण आपल्या कामाने त्यांचे चेहरे पडले असेही शिंदे यावेळी म्हणाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिंदेंचा ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. ही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. शिवाय बहीणीसाठी देता मग भावांसाठी काय असा प्रश्नही ठाकरे यांनी केला होता. याला जोरदार उत्तर शिंदे यांनी विधानसभेत दिले. ज्यांना सख्खा भाऊ कधी समजला नाही त्यांना लाडकी बहीण काय समजणार असा  टोला शिंदे यांनी लगावला. त्यांना फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी येवढेच माहित होते. पण आम्ही संपुर्ण महाराष्ट्राची जबाबदारी घेतली आहे असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ

सरकार पाडण्याची ओरड 

सरकारला दोन वर्ष पुर्ण होत आहेत. 2019 साली युतीला जनादेश होता. पण तो तुडवत मविआचं सरकार बनलं. पण आम्ही उठाव केला आणि महायुतीचं सरकार आणलं असे शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर हे सरकार पडणार अशी नेहमीच ओरड केली जात होते. पण सरकार काडी पडलं नाही. पण आम्ही केलेल्या कामा मुळे काहींचे चेहरे मात्र नक्की पडले असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. गेल्या दोन वर्षात 550 पेक्षा जास्त निर्णय घेतले. या काळात अनेक वेताळ आडवे आले. पण आम्ही विकासाचा विक्रम केला असेही शिंदे यांनी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - घडल्या प्रकाराबद्दल उद्धव ठाकरे उद्विग्न! म्हणाले, मी माफी मागतो

सरकार घरात नाही तर दारात गेलं 

मविआच्या काळात त्यांनी घरातून सरकार चालवलं. पण आम्ही राज्यातल्या जनतेच्या दारात सरकारला नेलं. असं शिंदे यांनी सांगत ठाकरेंवर निशाणा साधला. कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात असला पाहीजे असा टोलाही त्यांनी ठाकरे यांचे नवा न घेता लगावला. विरोधकांना आपल्या जबाबदारीचे भान असले पाहीजे. गेल्या दोन वर्षात त्यांनी फक्त सरकारला शिव्या देण्या शिवाय काही केले नाही. सभागृहातही तुम्ही आता शिव्या देत आहात असे दानवे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले. हे दुर्दैव आहे.  असं कधीही या आधी झाले नव्हते. ते विधान परिषदेत झाले असेही त्यांनी सांगितले. आम्ही केलेल्या कामामुळे तुमचा संयम सुटला आहे असे शिंदे विरोधकांना म्हणाले. 

Advertisement