महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या इच्छुकांनी मंत्रिपदासाठी मोर्चे बांधणी करायला सुरूवात केली आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेकांनी आपण मंत्री होणार अशीच वक्तव्य केली आहेत. तर काहींनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नक्की कोणाला संधी मिळणार हे गुलदस्त्यात आहेत. मर्यादीत मंत्रिपदं आणि इच्छुक मात्र जास्त अशी परिस्थिती आहे. अशात मंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार हे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यात आता कोणाचा पत्ता कट होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. शिवाय मागिल मंत्रिमंडळात जे मंत्री होते त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी अपेक्षा आहेत. जर तसं झालं तर नव्या इच्छुकांचं काय होणार असा प्रश्न आहे. त्यामुळे काही जणांना वगळल्यानंतर नव्या लोकांना संधी मिळू शकते. अशा वेळी कोणाची नाराजी पत्कराची याचा निर्णय एकनाथ शिंदे यांना घ्यावा लागणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपदं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी त्यात किती जणांना सामावून घ्यायचं हा प्रश्न आहे. शिवाय कोणाल वगळायचं याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - सफाई कामगार झाली उपमहापौर, आता रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ, कारण ऐकून हैराण व्हाल
या सर्व चर्चांना आत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी पुर्णविराम दिले आहे. ज्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं आहे. ज्यांचे चारित्र चांगले आहे. अशा मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाईल. किंवा अशा मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळेल. पण जे वादग्रस्त आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अशा एकाही मंत्र्याला परत संधी दिली जाणार नाही असे पावसकर यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय तरूण आणि नव्या चेहऱ्यांना शिवसेना संधी देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'मुंबई मारवाड्यांची,मुंबई भाजपची' मारवाड्याचा माज मनसेनं उतरवला
पावसकर यांनी मंत्री कोण होणार याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विद्यमान मंत्र्या पैकी कोणाचा पत्ता कट होऊ शकतो याची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. एकाच वेळी अनेकांना नाराज करणे शिंदेंना परवडणारे नाही. अशा वेळी शिंदेंना मध्यम मार्ग काढावा लागणार आहे. अडीच वर्ष मंत्रिपदाची संधी मिळालेल्यां पैकी किती जण मंत्रिपद कायम राखण्यात यशस्वी होतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच अलिकडच्या काळात इच्छुकांच्या शिंदें बरोबरच्या गाठीभेठी वाढल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी - सफाई कामगार झाली उपमहापौर, आता रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ, कारण ऐकून हैराण व्हाल
दरम्यान महायुतीत कोणीही नाराज नाही. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर पुढची प्रक्रिया पार पडेल असं ही पावसकर म्हणाले. खाते वाटपा बाबत अजूनही चर्चा नाही. ती चर्चाही भाजपच्या नेता निवडीनंतर होईल असं ते म्हणाले. शिवसेना कोणत्याही खात्यासाठी अडून बसलेली नाही. महायुती हे कुटुंब आहे. त्यामुळे अडून बसण्याचे कारण नाही. कोणाला काय मिळणार हे सर्वांनाच समजेल. त्यावरून महायुतीत कोणताही वाद नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world