विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीच्या विरोधात गेला. त्यानंतर मविआच्या नेत्यांनी त्याचे खापर ईव्हीएमवर फोडले. ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली. शरद पवारांनाही काही तरी गडबड झाली आहे असे वाटते. त्यांनी ही बाब या आधीही बोलून दाखवली आहे. कोल्हापुरीत आज शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसला शिवसेने पेक्षा जास्त मतं मिळाली. पण जागा कमी आल्या. तिच बाब त्यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आपल्या पक्षाबाबतही सांगितली. आम्हाला मतं जास्त पण जागा कमी आल्या असं कसं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देवेंद्र फडणवीस यांनी केल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, श्री शरद पवार साहेब,आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. ही आकडेवारी फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून समोर आणत पवारांचा दावा खोडण्याचा प्रयत्न केला आहे.
श्री शरद पवार साहेब, @PawarSpeaks
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2024
आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?
चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू,
भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.
शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7…
ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांची बेहिशोबी मालमत्ता झाली मुक्त, शरद पवारांनी उपस्थित केला मोठा प्रश्न
त्या पुढे फडणवीस म्हणतात पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे. असं ट्विटच्या शेवटी म्हटलं आहे. महाविकास आघाडीने ईव्हीएमबाबत आक्रमक भूमीका घेतली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यातच महायुतीचा झालेला विजयाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. खरोखरच असं झालं असेल का याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनीही आता त्याला हवा द्यायला सुरूवात केली आहे. शिवाय विरोधक आंदोलनाच्या भूमीकेत ही आहेत.
ट्रेंडिंग बातमी - असाही योगायोग! वडिलांप्रमाणेच लेकांचाही विधानसभेत एकत्र प्रवेश
लोकसभेला प्रमाणे विधानसभेला महाविकास आघाडीला पोषक वातावरण होते. पण निकाल पोषक लागले नाहीत असं शरद पवार म्हणाले. मतांची आकडेवारी पाहिल्यास काही तर गडबड झाली असावी अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. त्यात विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आमदारपदाची शपथही घेतली नाही. त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. शिवाय ईव्हीएम विरोधात आंदोलनाची घोषणाही केली आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आकडे कसे असतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world