महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांना शुभेच्छा देणारा फलक न्यूयॉर्क टाइम्सच्या स्क्वेअरच्या इमारतीवर झळकले आहे. त्यामुळे आपला आमदार थेट न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर इमारतीवर झळकल्याने त्यांचं कौतुक होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांना शुभेच्छा देणारा फलक थेट साता समुद्रापार अमेरिकेत झळकला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवरील प्रसिद्ध इमारतीवरील डिजिटल बिलबोर्डवर रोहित पाटलांना शुभेच्छा देणारा फलक झळकला आहे.
नक्की वाचा - अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं
हा शुभेच्छा देणारा फलक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित पाटलांच्या अभिनंदनाचे पोस्टर थेट अमेरिकेत त्यांच्या मित्रांनी झळकल्याचं बोललं जातंय. याबाबत रोहित पाटलांचे काका राजाराम पाटील यांनी देखील दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे एक महिन्यांपूर्वी या ठिकाणी विजयी जाहिरातीसाठी रोहित पाटलांच्या मित्र परिवाराकडून हे बुकिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा - दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे पहिलं मोठं आंदोलन उभं करणार, बैठकीत काय ठरलं?
माजी गृहमंत्री दिवंगत आरआर पाटील यांचे पूत्र रोहित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघात माजी खासदार संजयकाका पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी दिली होती. या दिग्गज नेत्याला पराभूत करीत रोहित पाटील खंबीरपणाने उभे राहिले. रोहित पाटील यांना 1,28,403 मतं पडली तर संजयकाका यांना 1,00,759 मतं पडली. तब्बल 27,644 मतांनी रोहित पाटील यांचा विजय झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world