जाहिरात

गिरीष महाजनांना उमेदवारी नाही, फडणवीस थेट बोलले, नव्या उमेदवारीची घोषणा ही केली

भाजपच्या ज्या मोजक्या नेत्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्या पैकी एक गिरीष महाजन हे ही आहेत. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणे मुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

गिरीष महाजनांना उमेदवारी नाही, फडणवीस थेट बोलले, नव्या उमेदवारीची घोषणा ही केली
जळगाव:

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस राज्य पिंजून काढत आहेत. ते नुकतेच त्यांचे खंदे समर्थक गिरीष महाजन यांच्या मतदार संघात गेले होते. भाजपच्या ज्या मोजक्या नेत्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्या पैकी एक गिरीष महाजन हे ही आहेत. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणे मुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. तुम्हाला तिकीट मिळणार नाही असे थेट देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पणे सांगितले. शिवाय नवा उमेदवार कोण याची ही घोषणा केली. त्यामुळे उपस्थित आवाक झाले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गिरीश महाजान यांचा जामनेर विधानसभा मतदार संघ गड समजला जातो. खान्देशातील भाजपचा ही तो गड मानला जातो. त्या गडाला महाजन यांनी आजपर्यंत तडा जावू दिला नाही. सध्या गिरीष महाजन हे मंत्रीमंडळात मंत्री आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यामुळे विधानसभेचे त्यांचे तिकीट नक्की समजले जात होते. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले. गिरीशभाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, 2029 मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. 2029 मध्ये साधना वहिनीच म्हणजे गिरीश महाजन यांच्या पत्नी निवडणूक लढणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांच्यापेक्षा साधना महाजन यांना जास्त मतं मिळणार असल्याचे ही फडणवीस म्हणाले. जामनेर येथे आयोजित शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. 

ट्रेंडिंग बातमी - 'शस्त्र बाहेर काढा, क्रांती करा, वचपा काढा' सर्वांच्या मेळाव्या आधी 'राज' गर्जना

गिरीश महाजन यांनी निवडणूक लढवावी. मात्र 2029 मध्ये गिरीश महाजन यांना तिकीट न देता गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना उमेदवारी देणार असल्याचे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांना पाडणार असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र, ते शक्य नसून गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं केवळ साधना महाजन याच घेवू शकतात असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - बांगलादेश ते मणिपूर, विजयादशमी निमित्त मोहन भागवत प्रत्येक गोष्टीवर बोलले

महिलांना एसटीमध्ये अर्ध तिकीट सवलत दिल्यापासून एसटी बस नफ्यात आली असल्याचे महाजन म्हणाले. एसटीमध्ये महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं एसटी बसेस या पूर्ण क्षमतेनं भरल्या आहेत. या योजनेमुळे महामंडळ नफ्यात आलं आहे. एवढ्या लोकप्रिय योजना देणारे सरकार हे राज्यात पहिल्यांदा आल्याचे महाजन म्हणाले. त्यांनी 50 50 वर्ष राज्य केलं ते आता भोंगे पसरवत आहेत. तुम्ही तर काही केलं नाही मग आज तुम्ही का ओरडता? असा सवाल महाजन  यांनी उपस्थित केला. 

ट्रेंडिंग बातमी - मुंडे- जरांगेंच्या दसरा मेळाव्याने वातावरण तापणार? गर्दीचा उच्चांक कोण मोडणार?

आमची तिजोरी खाली झाली. पगार कुठून देणार ते आम्ही पाहू. पगार देण्याचं काम आमचं आहे तुमचं नाही. आम्ही जोपर्यंत आहोत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा पगार बंद होणार नाही असेही महाजन म्हणाले. यावेळी आम्ही 1500 रुपये देतोय पुढच्यावेळी आम्ही तीन हजार रुपये करु असंही ते म्हणाले. त्यामुळे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले व ठाकरे गटवाले छाती ठोकून ओरडताय, रडताय की आता आमचं काय होईल. त्यांना आता माहिती आहे की कोणतीच बहीण आपल्याला मदत करणार नाही, कारण हेच काँग्रेसवाले महिलांच्या योजने विरोधात कोर्टात गेली आहे. त्यामुळं त्यांना आता रात्रीची झोप येत नाही असे महाजन यावेळी म्हणाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
बांगलादेश ते मणिपूर, विजयादशमी निमित्त मोहन भागवत प्रत्येक गोष्टीवर बोलले
गिरीष महाजनांना उमेदवारी नाही, फडणवीस थेट बोलले, नव्या उमेदवारीची घोषणा ही केली
Devendra-Fadnavis-Announces-Double-Honorarium-Increase-for-Maharashtra-Home-Guards
Next Article
होमगार्ड्सची दिवाळी गोड होणार, मानधनात घसघशीत वाढ, आता मिळणार...