जाहिरात

Political news: संभाजीराजेंना राज्यात दंगल घडवून आणायची आहे का? राजेंना कुणी केला सवाल?

संभाजीराजेंनी मे पर्यंत रायगडावरील वाघ्या या श्वानाची समाधी हटवण्याची भूमिका घेतली होती.

Political news: संभाजीराजेंना राज्यात दंगल घडवून आणायची आहे का? राजेंना कुणी केला सवाल?
बीड:

रायगड किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे आग्रही आहेत. त्यांनी त्याबाबतचे एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले आहे. काहींनी त्याचे समर्थन केले आहे तर काहींनी त्याचा विरोध केला आहे. काही जण वाघ्या कुत्र्याची इतिहासात नोंदच नव्हती असं म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण ही तापणार असं चिन्ह दिसत आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संभाजीराजेंनी मे पर्यंत रायगडावरील वाघ्या या श्वानाची समाधी हटवण्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळ घातली. मात्र याच भूमिकेला आता धनगर समाज विरोध करताना दिसून येत आहे. संभाजी राजे यांच्या भूमिकेबाबत धनगर समाज आक्रमक झाला आहे. संभाजी राजेंना राज्यात सामाजिक दंगल घडवायची आहे का? असा सवाल समाजा मार्फत उपस्थित करण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - जयकुमार गोरे ब्लॅकमेलिंग प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचं नाव; CM देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

एवढ्या मोठ्या राजांनी या छोट्या गोष्टीसाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला न लावता यात उतरू नये, असा धनगर समाजाचा आग्रह आहे. त्यांना ते शोभत नाही. मात्र संभाजी राजे यांनी आपली भूमिका कायम ठेवल्यास राज्यातील समस्त धनगर समाज रायगडाकडे कूच करेल असा इशारा बीड मधून धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी धनगर समाज एकवटला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Disha Salian: सालियान प्रकरणाला नवी 'दिशा', आता आदित्य ठाकरें बरोबर उद्धव ठाकरे ही अडकणार?

संभाजी राजेंनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीली होते. शिवाय वाघ्या कुत्र्याची रायगडावरील समाधी काढून टाकावी अशी मागणी केली होती. वाघ्या कुत्रा कधी ही महाराजां बरोबर नव्हता. त्याची कुठेही नोंद नाही. असं ही त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. पण आता त्याला धनगर समाजाने विरोध केल्याने हा वाद पेटण्याची शक्यता आहे. रायगड किल्ला हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे कुठले ही बांधकामाला हटवता येत नाही. औरंगजेबाच्या कबरीबाबतही तसेच आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: