जाहिरात

Iconic buildings: मुंबईत आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी नवीन धोरण, एकनाथ शिंदेंची घोषणा

जगातील विविध शहरांना त्यातील विशिष्ट प्रकारची नगररचना पध्दती, परिसर, विशिष्ट इमारती यामुळे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते.

Iconic buildings: मुंबईत आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी नवीन धोरण, एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई:

ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारतीमुळे मुंबईची एक वेगळी ओळख आहे. जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात वैशिष्टयपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालतानाच पर्यटनाला चालना मिळेल त्याचबरोबर मुंबईची विशिष्ट ओळख निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जगातील विविध शहरांना त्यातील विशिष्ट प्रकारची नगररचना पध्दती, परिसर, विशिष्ट इमारती यामुळे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते. मुंबई शहरात देखील ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारती असल्याने मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मुंबई हे एक जागतीक दर्जाचे शहर आहे. आपल्या देशाला वास्तुकलेचा फार मोठा वारसा आहे. तो जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई शहरात अशा वैशिष्टयपूर्ण आयकॉनिक इमारती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. असं शिंदे म्हणाले. जेणेकरुन शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये व पर्यटन क्षमता वाढ होण्यास हातभार लागेल. त्यामुळे मुंबई शहराची एक विशिष्ट ओळख निर्माण होईल, असं ही त्यांनी स्पष्ट केलं.  

ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde: नवी मुंबईत रखडलेल्या पुनर्विकासाला चालना मिळणार, शिंदेंच्या 'त्या' निर्णयामुळे मोठा दिलासा

विशीष्ट प्रकारच्या इमारतींकरीता मुंबईसाठी सध्या लागू असलेल्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदींमुळे मर्यादा येत आहेत. अशा वैशिष्टपूर्ण इमारती उभारणे शक्य व्हावे व वास्तुकलेस चालना मिळावी, याकरीता आयकॉनिक इमारती करीता नवीन धोरण सरकारने तयार केले आहे. आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी मुंबईच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये स्वतंत्र तरतुद समाविष्ट करण्यासाठी नियमावलीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने नियमावलीमध्ये फेरबदल करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: