जाहिरात

मुख्यमंत्री शिंदे मुंबईत ताकद दाखवणार? ठाकरेंना थेट भिडणार,'या' जागांची केली मागणी

शिवसेनेतल्या फुटीनंतर मुंबईत ठाकरेंची की शिंदेंची ताकद हे या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी बाजी मारत चार पैकी तीन जागांवर विजय मिळवला.

मुख्यमंत्री शिंदे मुंबईत ताकद दाखवणार? ठाकरेंना थेट भिडणार,'या' जागांची केली मागणी
मुंबई:

विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती कामाला लागली आहे. जागा वाटपाची प्राथमिक चर्चाही सुरू झाली आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यातल्या जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात अशी रणनिती एकनाथ शिंदे यांनी आखली आहे. मुंबई हा शिवसेनेचा गड समजला जातो. मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर मुंबईत ठाकरेंची की शिंदेंची ताकद हे या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी बाजी मारत चार पैकी तीन जागांवर विजय मिळवला. तर एका जागेवर निसटता पराभव झाला. हे पाहात मुंबईत ताकद दाखवण्याची रणनिती शिंदे यांनी आखली आहे. त्यामुळे मुंबईतल्या हव्या असलेल्या जागांची यादीच शिंदे यांनी भाजपला दिली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पक्षाची बैठक घेतली. या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईतल्या किती जागांवर लढायचे हे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेना शिंदे गटाने भाजपकडे मुंबईतल्या 36 पैकी 17  जागांवर दावा केला आहे. जवळपास निम्म्या जागा मिळाव्यात अशी शिंदे यांची भूमिका आहे. या जागांची यादीही त्यांनी भाजपला दिली आहे. यामध्ये भायखळा विधानसभा मतदार संघासह वरळी, शिवडी, जोगेश्वरी-पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्ती नगर, माहीम, धारावी, भांडुप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, अंधेरी-पूर्व, मालाड-पश्चिम, मागठाणे, चांदिवली आणि कलिना या मतदार संघाचा समावेश आहे. यातील धारावी, अंधेरी पूर्व, मालाड-पश्चिम आणि चांदिवली मतदार संघात शिवसेना शिंदे गटाची लढत काँग्रेस बरोबर होईल. तर इतर 13 जागांवर थेट ठाकरे विरूद्ध शिंदे गट अशी लढत होईल. 

ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंचा नवा डाव, मुंबईत 22 जागांवर लढण्याची तयारी... वाचा संभाव्य यादी

भाजपकडे हा प्रस्ताव शिंदे गटाने दिला आहे. त्यामुळे भाजप त्यातल्या किती जागा शिंदे गटाला सोडणार हा खरा प्रश्न आहे. लोकसभेला शिंदे गटाने मुंबईतल्या तीन जागा लढवल्या होत्या. त्यातल्या एका जागेवर विजय मिळवला होता. लोकसभेला निम्म्या जागा पदरात पाडण्यात शिंदेंना यश आले होते. तिच रणनिती शिंदेंनी विधानसभेसाठी आखली आहे. ठाकरें बरोबर थेट लढत देण्यावर त्यांचा भर आहे. ठाकरेंना मुंबईत धक्का दिला तर त्याचा परिणाम राज्यभर होवू शकतो. आजही मुंबईवर ठाकरे गटाची चांगली पकड आहे. या बालेकिल्ल्यालाच खिंडार पाडण्याची रणनिती या माध्यमातून शिंदे यांनी आखली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - आरोग्य मंत्र्यांसाठी परांड्याची वाट बिकट? करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार?

एकीकडे शिंदे यांनी 17 जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या जवळपास 22 जागांवर दावा केला आहे. उद्धव ठाकरेंसाठी मुंबई अतिशय महत्त्वाची आहे. मुंबई महापालिकेवर त्यांची अनेक वर्ष सत्ता होती. त्याचबरोबर कोणत्याही निवडणुकीत मुंबईतील जास्तीत जास्त जागा लढवण्याची त्यांची आग्रही भूमिका असते. लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षानं मुंबईतील 6 पैकी 4 जागा लढल्या होत्या. त्यापैकी 3 ठिकाणी पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. लोकसभेतील यशानंतर पक्षानं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षानं 22 मतदारसंघात लढण्याची तयारी सुरु केली असून संभाव्य उमेदवारांची यादी देखील तयार केली आहे. 
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
2 बड्या नेत्यांमुळे भाजपा प्रवेश रखडला, एकनाथ खडसेंनी थेट नावं सांगितली
मुख्यमंत्री शिंदे मुंबईत ताकद दाखवणार? ठाकरेंना थेट भिडणार,'या' जागांची केली मागणी
NCP leader satish-patil-opposes-eknath-khadse-entry-into-ncp
Next Article
भाजपनंतर राष्ट्रवादीतही खडसेंना नो एन्ट्री? रोहिणी खडसेंचाही पत्ता कट होणार?