'मला निवडून दिलं तर शिंदे मुख्यमंत्री होतील, अन् दीडचे तीन होतील'

कुणी कितीही लालूच दिली तरी माणसं बेमान होतील. मात्र आमच्या लाडक्या बहीणी बेईमान होणार नाहीत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होवू शकते. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकही प्रचाराला लागले आहेत. सध्या राज्यात लाडक्या बहीण योजनेचे जोरदार प्रसिद्धी केली जात आहे. ही योजना केंद्रस्थानी दिसते. सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा चंग बांधला आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका मंत्र्याने मोठं विधान केलं आहे. जर तुम्ही मला निवडून दिलं, तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होती. शिवाय ते मुख्यमंत्री झाले तर लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपयांवरुन तीन हजार रुपये होती असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

गुलाबराव पाटील हे शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. महायुतीचे जागा वाटप अजून सुरू आहे. शिवाय मुख्यमंत्री कोण? यावरही कोणता निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री झालाच तर तो महायुतीचा होईल असं सांगितलं जात आहे. महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. असं असतानाही गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडींग बातमी - निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केल मग नदीत फेकले

मतदारांना आवाहन करताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले मला निवडून द्या. मला निवडून दिलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होती. ते मुख्यमंत्री झाले तर लाडक्या बहीणीला दिड चे तीन हजार मिळायला सुरूवात होती. पण जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दीड हजार ही बंद करतील. असं ही ते म्हणाले. आमचं सरकार आलं तर लाडक्या बहीणीचे तीन हजार करण्याची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - चेंबूरमध्ये भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

कुणी कितीही लालूच दिली तरी माणसं बेमान होतील. मात्र आमच्या लाडक्या बहीणी बेईमान होणार नाहीत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळेच गुलाबराव पाटील व एकनाथ शिंदे यांचे सरकार पुन्हा लाडक्या बहीणी निवडून देणार असे ही ते म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. अंबे दार उघड. आमच्या विरोधात जे बोलत आहेत व गोरगरिबांना जे हिणवत आहेत त्यांचा सत्यनाश कर असे साकडेच गुलाबराव पाटील यांनी घातले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE : रत्नागिरीत ठाकरे गटाला खिंडार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिंदेंच्या सेनेत

दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना आपण मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे पाटील म्हणाले. त्या दिवशी जी गर्दी होईल ती पाहून विरोधक कोमात जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या विरोधकांना आपण चारीमुंड्या चित करणार आहोत असेही ते म्हणाले. नुसतं भाषण करून चालत नाही. तर त्यासाठी कामही करावं लागतं. विरोधक केवळ विरोधाला विरोध करत आहेत असा आरोपही यानिमित्ताने त्यांनी केला.