जाहिरात
This Article is From Oct 06, 2024

चेंबूरमध्ये भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी ही झाले आहेत. त्यांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.

चेंबूरमध्ये भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत मोठी आग लागली होती. यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी ही झाले आहेत. त्यांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. पहाटे 4:30 ते 5:00 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात यश आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनी आहे. या कॉलनीत दाटीवाटीनं घरं आहे. मोठ्या प्रमाणात लोक इथं राहाता. सतत गजबज असलेला हा भाव आहे. शनिवारी रात्री इथं सर्व जण झोपेत असताना एक दुर्घटना घडली. पाहाटे साडे चार वाजताय या कॉलनीला आग लागली. झोपेत असल्याने अनेकांना काय घडलं हे समजलंच नाही. ज्या वेळी समजलं त्यावेळी मात्र फार उशीर झाला होता हे आता समोर येत आहे. 

ट्रेंडींग बातमी - निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केल मग नदीत फेकले

या कॉलनीत राहाणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यात एक मुलगी ही सात वर्षाची आहे. तर एक मुलगा हा दहा वर्षाचा आहे. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 9 महिन्याचा चिमुकला, गळ्याला साप चावला, 20 दिवस बेशुद्ध, नंतर जे झालं ते...

या घटनेत प्रेसी प्रेम गुप्त वय 6 वर्ष, मंजू प्रेम गुप्ता वय 30 वर्ष , अनिती धर्मदेन गुप्ता वय 39 वर्ष, प्रेम गुप्ता वय 30 वर्ष, नरेंद्र गुप्त वय 10 वर्ष, निधी गुप्ता वय 15 वर्ष आणि गीता देवी गुप्ता वय 60 वर्ष या सात जणांचा यात मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर हे सर्व जण त्यात होरपळले होते.त्यांना तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यावेळी त्यांनी तिथे मृत म्हणून घोषीत करण्यात आले. 

ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE : शिवस्मारकावरून संभाजी राजे आक्रमक, शिवस्मारक शोधण्याचे आंदोलन छेडले

घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र ऐन सणाच्या वेळी एकाच कुटुंबातील सात जणांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हे शॉर्ट सर्कीट कशामुळे झाले याचा तपास आता केला जात आहे. आग लागल्यानंतर या परिसरात एकच धावपळ उडाली होती. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com