जाहिरात

Big News: पुढील अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणणार, सरकारची मोठी घोषणा

त्याला उत्तर देताना पुढील अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणणार असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं.

Big News: पुढील अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणणार, सरकारची मोठी घोषणा
मुंबई:

राज्यात धर्मांतर विरोधात कायद्याच्या अभ्यासासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालातील सूचनांचा विचार करून पुढील अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा मान्यतेसाठी सादर केला जाईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. त्यांनी ही माहिती विधान परिषदेत दिली.  उमा खापरे यांनी पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेच्या अनाथ आश्रमात मुली व महिला यांचे धर्मांतरण केले जात असल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

नक्की वाचा - Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...

या लक्षवेधीच्या चर्चेवेळी प्रवीण दरेकर, मनिषा कायंदे आणि सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला होता. त्याला उत्तर देताना पुढील अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणणार असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं. केडगाव येथील घटनेचा ही त्यांनी उल्लेख केला. इथल्या अनाथ आश्रमामध्ये मुलींचे धर्मांतरण तसेच मुलींना मारहाण करणे, सार्वजनिक शौचालय साफ करायला लावणे, जातीवरून शिवीगाळ करणे, वाईट वागणूक देणे अशा फिर्यादी आल्या होत्या. 

नक्की वाचा - Nimisha Priya: आई-वडिल्यांच्या सुखी जीवनासाठी परदेशी गेली, पण आता परतण्याची शेवटची आशाही मावळली

त्यानुसार  8 डिसेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या संस्थेतील अनियमितता तसेच सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यासंदर्भात तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  याबाबतचा अधिक तपास सुरू असून एका महिन्यात याचा चौकशी अहवाल प्राप्त होईल. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com