Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र पार रंगून गेलाय. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधासभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पण अनेकांना, अजूनही मतदार यादीतील नाव कसं तपासावं हे माहितच नाही. त्यामुळे अनेकजण मतदार यादीत नाव नसतानाही मतदान केंद्रावर मतदानासाठी जातात. आणि तिथे पोहचल्यावर मतदार यादीत आपलं नाव नसल्याचं लक्षात येतं. त्यामुळे काही वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता असं होणार नाही. आता घरबसल्या मतदार यादीत नावाचा समावेश करता येईल. त्यापुर्वी जाणून घेऊया मतदार यादीतील नाव कसं तपासावं?
(नक्की वाचा : Code of Conduct : आचारसंहितेचं उल्लंघन होतंय? एका क्लिकवर तक्रार करा)
मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे, ऑनलाईन पद्धतीने मतदान यादीतील नाव तपासणे. electoralsearch.eci.gov.in या लिंकवर जाताच, एका पेजवर स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या सर्व माहितीची नोंद करावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘कॅप्चा' कोड टाकावा आणि मग संबंधित यादी उघडेल. आणखी एक मार्ग म्हणजे, ज्याद्वारे electoralsearch.eci.gov.in वर EPIC किंवा मतदार आयडी क्रमांकाद्वारे यादीतील तुमचे नाव तपासू शकता. EPIC क्रमांक आणि राज्य निवडून, मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तुम्हाला कळेल. मतदार यादीतील नाव शोधण्याचे दोन्ही पर्याय electoralsearch.eci.gov.in ला भेट दिल्यावर सर्वांत वर दिसतील. या प्रकारे विधानसभा निवडणूक मतदान यादीत तुमचे नाव तपासू शकता. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या टोल फ्री क्रमांक 1950 वर कॉल करून तुमच्या मतदार यादीची माहिती मिळवू शकता.
(नक्की वाचा : AB Form : ‘एबी' फॉर्म म्हणजे नक्की काय? उमेदवार इतका महत्त्वाचा का असतो हा फॉर्म?)
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-
https://voters.eci.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक 6 भरावा लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर किंवा ईमेल पत्ता वापरून साइन अप केल्यानंतर हा फॉर्म ऑनलाइन भरता येतो.
नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि नातेवाईक (वडील, आई, पती किंवा पत्नी) यासोबतच विचारली गेलेली सर्व माहिती अचूक भरावी.
यानंतर आधार क्रमांक, जन्मतारीख सबमिट करून आधार कार्डचा फोटो आणि जन्म प्रमाणपत्राचा फोटो अपलोड करा. शेवटी कॅप्चा कोड टाका आणि फॉर्म सबमिट करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर साधारण, एक महिन्याच्या आत मतदार कार्ड तुमच्या घरी पोहोचेल. त्याचबरोबर सबमिशननंतर एक पावती क्रमांक मिळेल ज्याच्या मदतीने एका आठवड्यानंतर कधीही मतदार फॉर्मची स्थिती तपासता येते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world