जाहिरात

घरबसल्या करता येणार मतदान; जाणून घ्या कोण असणार पात्र आणि कशी आहे प्रक्रिया?

Vote From Home: निवडणूक आयोगाकडून यंदा घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जाणून घेऊया घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेचा वापर कोण करू शकणार आणि कशी असणार प्रक्रिया?

घरबसल्या करता येणार मतदान; जाणून घ्या कोण असणार पात्र आणि कशी आहे प्रक्रिया?

Vote From Home Eligibility And Process:  संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांकडे लागून आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडतील. आणि 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित केले जाणार. पण, काहीजण निवडणुकांना अजिबात महत्त्व देत नाहीत. म्हणूनच यंदा निवडणूकांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून काही नागरिकांना 12डी फॉर्मद्वारे, घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधा देण्यात आली आहे. पण या सुविधेसाठी नेमकं  कोण पात्र असेल? व कशी असेल प्रक्रिया याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

घरबसल्या मतदार यादीत नाव नोंदवा, या सोप्या स्टेप्स फॉलो करा

(नक्की वाचा: घरबसल्या मतदार यादीत नाव नोंदवा, या सोप्या स्टेप्स फॉलो करा)

देशात बहुसंख्य मतदार वृद्ध आणि दिव्यांग आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या त्याचबरोबर दिव्यांग मतदारांना घरबसल्या म्हणजेच पोस्टल बॅलटद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे जे नागरिक हा  12डी फॉर्म भरून पोस्टल बॅलेटचा पर्याय निवडतील ते मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास पात्र नसतील.  

EVM च्या सुरक्षेत हलगर्जीपणा; वाशिम जिल्ह्यातील 6 पोलीस निलंबित

(नक्की वाचा: EVM च्या सुरक्षेत हलगर्जीपणा; वाशिम जिल्ह्यातील 6 पोलीस निलंबित)

 

घरबसल्या मतदानासाठी नोंदणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे-

 85 वर्षांपुढील ज्या नागरिकांना घरबसल्या मतदान करायचं असेल त्यांना फॉर्म 12D भरावा लागेल.

जे ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग मतदार घरून मतदान करू इच्छित असतील, त्यांना मतदानाची अधिसूचना जारी झाल्यापासून पाच दिवसांच्या आत निवडणूक आयोगाच्या जवळील कार्यलयातील बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडे फॉर्म 12 D भरून जमा करावा लागेल.

निवडणूक आयोगाच्या http://www.eci.gov.in या वेबसाइटवरून 12D हा फॉर्म डाउनलोड करुन घ्या. तसच फॉर्म 12D विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी जिल्हा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. 

PWD श्रेणीतील मतदारांसाठी फॉर्म 12D सोबत बेंचमार्क अपंगत्व प्रमाणपत्राची प्रत असावी.

एकदा का फॉर्म मंजूर झाला तर, मतदान अधिकारी, व्हिडिओग्राफर आणि एक सुरक्षा व्यक्ती, पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी पात्र व्यक्तीच्या घरी भेट देतील. 

त्यानंतर मतदाराला फॉर्म मंजूर झाला की नाही, त्याचबरोबर इतर सूचना  एसएमएस किंवा पोस्टद्वारे मिळतील. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: