जाहिरात

EVM च्या सुरक्षेत हलगर्जीपणा; वाशिम जिल्ह्यातील 6 पोलीस निलंबित

Washim News : जिल्हाधिकारी यांच्या निरीक्षणानंतर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तात्काळ कारवाई करत या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

EVM च्या सुरक्षेत हलगर्जीपणा; वाशिम जिल्ह्यातील 6 पोलीस निलंबित

साजन ढाबे, वाशिम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील कारंजा  आणि वाशिम शहरात ठेवलेल्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी ही कारवाई केली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी अचानक भेट देऊन ईव्हीएमच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यावेळी कारंजा येथे दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक हवालदार आणि एक शिपाई हे ड्युटीवर असताना गाढ झोपलेले आढळून आले होते. तर वाशिममध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्ट्राँग रूमच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यावेळी दोन कर्मचारी अनुपस्थित आढळले होते.

नक्की वाचा-  लोकसभेची पुनरावृत्ती होणार? अंबरनाथ, मुरबाडमध्ये मविआला 'या' उमेदवारांचा फटका बसणार?

जिल्हाधिकारी यांच्या निरीक्षणानंतर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तात्काळ कारवाई करत या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. ईव्हीएम सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने आधीच कडक निर्देश देण्यात आले होते. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून निवडणूक आयोगानेही अशा हलगर्जीपणाबाबत गंभीर दखल घेतली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com