जाहिरात

Shiv Sena News: 'ज्यानी एकनाथ शिंदेंचे पुतळे जाळले, तेच आता...' शिंदेंच्या सेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

निलेश पाटील यांनी घेतलेल्या या जाहीर भूमीकेनंतर विष्णू भंगाळे यांनीही पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Shiv Sena News: 'ज्यानी एकनाथ शिंदेंचे पुतळे जाळले, तेच आता...' शिंदेंच्या सेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर
जळगाव:

एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेत सध्या अनेक नेते पक्ष प्रवेश करत आहेत. त्यात काही शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांचाही समावेश आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही ओढ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. मात्र हे सर्व एकत्र आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे. इथं जिल्हा प्रमुखपदावरून सध्या जिल्ह्यात घमासान होताना दिसत आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्नच शिंदें समोर आता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुखपदावर निलेश पाटील यांची नियुक्ती एकनाथ शिंदे यांनी केली होती. निलेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटात आल्यानंतर त्यांची जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांना हटवून त्यांच्या जागी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंगाळे हे ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा प्रमुख होते. शिवाय त्यांनी महापौरपदही भूषवलं आहे. भंगाळे यांनी ठाकरेंची साथ सोडताच त्यांना जिल्हाप्रमुख पदाचे बक्षिस देण्यात आले. मात्र त्यामुळे निलेश पाटील हे भलतेच नाराज झाले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Yashomati Thakur: 'त्रिशूल वाटपाच्या नावाखाली शस्त्र वाटप' काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

निलेश पाटील यांनी यावेळी विष्णू भंगाळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यांनी एकनाथ शिंदे यांचे पुतळे जाळले. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला आंदोलन केलं. निवडणुकीपर्यंत शिंदें  विरोधात काम केलं. ते इकडे आल्याबरोबर त्यांना जिल्हाप्रमुख  कसे केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत आपण एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली होती. त्यानंतर भंगाळे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. पण गुलाबराव पाटलांनी विष्णू भंगाळे यांना कायम ठेवले असा आरोप निलेश पाटील यांनी केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - black magic: कान कापलेला बोकड, पाय बांधलेल्या कोंबड्या अन् स्मशानभूमी, मध्यरात्री काय घडलं?

दरम्यान निलेश पाटील यांनी घेतलेल्या या जाहीर भूमीकेनंतर विष्णू भंगाळे यांनीही पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाटील हे राष्ट्रवादीतून आलेले आहेत. खरा शिवसैनिक मी आहे. एका व्यक्तीमुळे पक्षातला वाद चव्हाट्यावर येत नाही. पण मी मोठा ही गुर्मी चुकीची आहे असा टोलाही भंगाळे यांनी पाटील यांना लगावला आहे. पाटील आणि भंगाळे यांचा जिल्हा प्रमुखपदावरचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे. नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी त्यात हस्तक्षेप केला होता. आता त्यानंतर शिंदे काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.