
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात गावागावात त्रिशुल वाटपाच्या नावाखाली शस्त्र वाटप केले जात आहे. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. वाटप होत असलेली त्रिशुल नाहीत तर गुप्त्या आहेत असंही त्या म्हणाल्या. अमरावती इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. असा कृत्यामुळे जिल्ह्यातलं वातावरण बिघडेल असंही त्या म्हणाल्या. तर स्वरक्षणासाठी त्रिशुल वाटप केलं तर काय बिघडं असं म्हणत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी त्याचे समर्थन केलं आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरात भागात मोठ्या प्रमाणात त्रिशूलच्या नावावर शस्त्रांचं वाटप होत आहे. त्रिशूलच्या नावावर गुप्त्यांचं वाटप होत आहे असा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. या शस्त्रांचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत वाटप होत असलेल्या शस्त्रांचा फोटो ही दाखवला.
मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. त्यांच्याकडे गृह खाते ही आहे. असं असतानाही अमरावतीत हे प्रकार कसे घडतात असा प्रश्न त्यांनी केला आहे. दरम्यान या शस्त्र वाटपाची माहिती आपण अमरावतीचे पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांना व्हाट्सअप वरून दिल्याचं देखील यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. या शस्त्राचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला. गुन्हेगारांनी यात आपले हात धुवून घेतले तर त्याला जबाबदार कोण असेल असं ही त्या म्हणाल्या. त्यामुळे जे शस्त्र वाटप सुरू आहे ते तातडीने बंद करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यशोमती ठाकूर यांचे हे आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मात्र फेटाळून लावले आहेत. यशोमती ठाकूर यांनी गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यांना दुर्योधन आणि दुशासनाच्या क्रुर गोष्टी दिसत नाहीत. तसं यशोमती ठाकूर यांना सत्तर कोयते दिसत नाहीत. स्वसंरक्षणासाठी एखाद्या भगीनीला त्रिशूल जर दिले तर त्यांना शस्त्र वाटतं असं बोंडे यावेळी म्हणाले. शिवाय त्यांनी त्रिशुल वाटपाचे अप्रत्यक्षरीत्या समर्थनही केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world