भाजप सरकार आल्यानंतर रावसाहेब दानवेंना मिळणार मोठे गिफ्ट, अमित शाहांची घोषणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याबाबत एक मोठी घोषणा केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ बुधवारी (8 मे 2024) सभा घेतली. दरम्यान याचवेळी अमित शाह यांनी रावसाहेब दानवे यांच्याबाबत एक मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections 2024) देशात भाजपचे सरकार आल्यानंतर दानवे यांना मोठे पद देणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी भरसभेत केली. त्यामुळे देशात भाजपचे सरकार आल्यानंतर दानवेंना पक्षाकडून नेमके कोणते मोठे गिफ्ट मिळणार, यावर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

(नक्की वाचा: 'सुपाऱ्या, सेटिंग अन् बरंच काही' राजन विचारेंचे खळबळजनक आरोप)

विरोधकांवर साधला निशाणा

"लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना एक-एक मत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी द्यावे. अयोध्येत मंदिर झाले पाहिजे, अशी पंतप्रधान मोदी यांची भूमिका होती. मात्र याला विरोधकांनी विरोध केला, रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण दिले तर त्यासही विरोध केला, असे म्हणत शाह यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त 

(नक्की वाचा: सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांनी उधळला विजयाचा गुलाल, निवडणुकीच्या निकालाआधीच सेलिब्रेशन)

"उद्धव ठाकरेंच्या लोकांनी कोरोना रुग्णांची खिचडी खाल्ली"

मोदी सरकारने काश्मीरमधील 370 कलम हटवण्याचे काम केले. जनतेला महत्त्वपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. कोरोना काळात आमच्या सरकारने 130 कोटी लोकांना मोफत लस दिली. दुसरीकडे कोरोना काळात उद्धव ठाकरे यांचे लोक कोरोना रुग्णांची खिचडी खाण्याचे काम करत होते, असेही टिकास्त्र देखील शाह यांनी सोडले

भाषणादरम्यान अमित शाह असेही म्हणाले की, 'देशात निवडणुकीचे युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूकडील सैन्य तयार आहेत. एकीकडे घोटाळेबाज इंडिया आघाडीतील पक्षाच्या नेत्यांकडे पैसे सापडत आहेत. तर दुसरीकडे 25 पैशांचा आरोप नसलेले पंतप्रधान मोदी आहेत. कोणाच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे, हे तुम्ही ठरवले पाहिजे".

(नक्की वाचा: लोकसभेच्या तोंडावर भाजपला धक्का? अपक्षांनी पाठिंबा काढला, सरकार अल्पमतात?)
VIDEO: Eknath Shinde यांचा Uddhav Thackeray यांच्यावर हल्लाबोल, "ठाकरे गट पाकिस्तानची बोली बोलतायत

Topics mentioned in this article