जाहिरात

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये आज मतदान, काश्मिरी पंडितांसाठी विशेष सोय

जम्मू कश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅश्नल कॉन्फरन्सची युती आहे. तर भाजप त्यांच्या विरोधात निवडणुकीत उतरला आहे.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये आज मतदान, काश्मिरी पंडितांसाठी विशेष सोय
श्रीनगर:

कलम 370 हटवल्यानंतर जम्मून कश्मीर विधानसभेसाठी (Jammu Kashmir Assembly Elections 2024)  आज पहिल्यांदाच मतदान होता आहे. जवळपास दहा वर्षानंतर जम्मू कश्मीरचा मुख्यमंत्री कोण असावा यासाठी जनता मतदान करेल. 7 जिल्ह्यातील 24 जागांसाठी सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जम्मू कश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅश्नल कॉन्फरन्सची युती आहे. तर भाजप त्यांच्या विरोधात निवडणुकीत उतरला आहे. तर मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी स्वबळावर निवडणूक लढत आहेत. कश्मीर खोऱ्यात अनेक उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे इथे बहुरंगी लढती होत आहेत. पण मुख्य लढत ही इंडिया आघाडी विरूद्ध एनडीए अशीच होत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जम्मू कश्मीरमध्ये जवळपास 90 विधानसभेच्या जागा आहेत. त्यातल्या 46 जागा या कश्मीर खोऱ्यातील आहेत. तर  43 जागा या जम्मू मधील आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कश्मीर मधील निवडणूका या तीन टप्प्यात घेतल्या जात आहेत. 25  सप्टेबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर 1 ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यात मतदान केले जाणार आहे. 8 तारखेला मतमोजणी होईल. विशेष म्हणजे यातले जवळपास पस्तीस हजार मतदार कश्मीरी हे उधमपूर आणि दिल्लीत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यासाठी 24 मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. 

ट्रेंडिंग - लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या पेजर्समध्ये स्फोट, 1000 हून जास्त जणं जखमी

या निवडणुकीचे वैशिष्ठ म्हणजे कश्मीर मधून विस्थापित झालेल्या जवळपास 35,000 कश्मीरी पंडीताना मतदान करता येणार आहे. हे कश्मीरी पंडीत सध्या जम्मू किंवी दिल्ली मध्ये राहातात. त्यांच्यासाठी 24 मतदान केंद्र उभी करण्यात आली आहेत. विस्थापीत कश्मीरी पंडीत हे दक्षिण कश्मीरच्या अनंतनाग, पुलवामा,शोपियां, कुलगांम जिल्ह्यातील 16  विधानसभा मतदार संघासाठी मतदान करणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - 'भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर....' गिरीश महाजनांनी सांगितलं एकच नाव

जम्मू कश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह आहे. मतदानाची सर्व तयारी आयोगाने पुर्ण केली आहे. या निवडणुकीत जवळपास 87.09 लाख मतदाता आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. यात जवळपास  42.07 लाख या महिला आहे. तर 3.71 लाख हे महिल्यांदा मतदान करणारे मतदाता आहेत. तर वीस लाख मतदाता हे वीस ते एकोणतीस वर्ष वयोगटातील आहेत. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
पुण्यात भाजपाला मोठा धक्का, 'या' नेत्यानं हाती घेतली तुतारी
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये आज मतदान, काश्मिरी पंडितांसाठी विशेष सोय
BJP mp anil bonde on rahul gandhi over reservation statement amravati news
Next Article
"राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य