जाहिरात

Jitendra Awhad: 'आता यांना ऑपरेशन डाँकी...' आव्हाडांनी ऑपरेशन टायगरवरून कुणाला झापलं?

सामंत यांनी ऑपरेशन टायगर, पक्ष फोडणे हे आता बस करावं. लोक तुमच्या बद्दलच संशय व्यक्त करत आहेत, असा आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad: 'आता यांना ऑपरेशन डाँकी...' आव्हाडांनी ऑपरेशन टायगरवरून कुणाला झापलं?
ठाणे:

शिवसेना ठाकरे गटाचे सहा ते सात खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवाय काही माजी आमदार ही शिंदेंच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटाने ऑपरेशन टायगर हाती घेतल्याचं बोललं जात आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना चांगलेच छापले आहे. यांना आता ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेश डाँकी करायला सांगितलं पाहीजे. ही सर्व काही आता थांबवा, महाराष्ट्रात जी कामं पडली आहेत ती आता खांद्यावर घ्या असा सल्लाही दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीत 240 आमदार मिळाले. अजून काय पाहीजे. त्यानंतर आता कसली फोडाफोडी करताय असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हे सर्वा आता थांबवा. पक्ष फोडण्या पेक्षा महाराष्ट्रात जी कामं पडली आहेत, त्याकडे थोडं लक्ष्य द्या. ती कामं तुमच्या खांद्यावर घ्या. यावेळी त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही सुनावलं. हे दाओसला गुंतवणूक आणायला गेले होते. पण तिथे जाऊन ही ते फोडा फोडीचचं बोलत होते. त्यासाठी तुम्हाला तिकडे पाठवलं होतं का असा प्रश्नही आव्हाड यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray:'फोडाफोडी कराल तर तुमची डोकी फोडू' उद्धव ठाकरेंचा इशारा कुणाला?

त्यामुळे सामंत यांनी ऑपरेशन टायगर, पक्ष फोडणे हे आता बस करावं. लोक तुमच्या बद्दलच संशय व्यक्त करत आहेत. हाच माणूस पहिली गद्दारी करेल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत असं बोललं जात आहे. हा संशय लोक तुमच्याबद्दल व्यक्त करत आहेत. कारण का एकदा जर का गद्दारीचा शिक्का लागला तर त्या माणसाच्या मागून गद्दारीचा शिक्का जात नसतो. त्यामुळे हे बोलणं बंद करा. तुम्ही आज ज्या लोकांबद्दल बोलत आहात त्यांच्या बरोबर तुम्ही या आधी खांद्याला खांदा लावून काम केलं आहे हे विसरू नका असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कुणाला वगळले? यादी आली समोर

पालकमंत्रीपदाच्या वादावरही आव्हाड यांनी आपलं मत व्यक्त केलं. पालकमंत्री म्हणजे पैशांचं स्तोत्र आहे. एकंदरीत यांच्या वागण्यावरून हे दिसायला लागलं की पालकमंत्री म्हणजे काय असतो, मला वाटतं जिल्ह्यात जी लुटमार करायची असते ती लूटमार करण्यासाठी पालकमंत्र्यांची नेमणूक केली जाते, असा यांच्या नेमणुकांवरून दिसतय असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. लाडकी बहीण मधून पाच लाख बहिणी कमी केल्या, म्हणजे पाच लाख मतं यांची कमी झाली. हे सर्व मतांसाठी केलं होतं .बहिणींच्या प्रेमापोटी नाही, याच्यातून हे सिद्ध झालं असंही ते म्हणाले.