
अमजद खान
15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले. ही कुठली नवी राज्य व्यवस्था आली की लोकांच्या तोंडाला कुलूप लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी टिका राष्टवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. केडीएमसीने 15 ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर बंदी घातल्याचा आदेश काढला होता. त्याला आव्हाड यांनी विरोध केला होता. वाढता विरोध पहाता आयुक्त निर्णय मागे घेतली असं वाटतं होतं. पण त्यांनी निर्णय मागे घेतला नाही. आयुक्तांनी निर्णय मागे न घेतल्याने सकाळी काँग्रेस पक्षाने कोंबडी आंदोलन केले. तर जितेंद्र आव्हाडांनीही मटण पार्टीला हजेरी लावत केडीएमसीच्या निर्णयाचा निषेध केला.
नक्की वाचा - EVM मधला निकाल बदलला, जिंकलेला हरला आणि हरलेला जिंकला
यावेळी आव्हाड म्हणाले की, माझ्याकडे जीआर आहे. त्यात कुठे म्हटले आहे विक्रीला बंदी, कत्तल खान्याला बंदी आहे. त्यामुळे आमचे हेच म्हणणे आहे की ही जोर जबदस्ती कशासाठी करता. स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे. मांसाहार विरुद्ध शाकाहार ही लढाई लावून देण्याचं हे काम आहे असा आरोप त्यांनी केला. या सरकारची जाती, प्रांत, धर्म आणि भाषांमध्ये लढाई लावून जेणे करुन आमचे भले झाले पाहिजे अशी भूमीका आहे असं ही ते म्हणाले. महापालिका आयुक्तांना त्यांनी विनंती केली की नको तिथे कामं करू नका. शहरातले रस्ते आणि गटारे सुधारा असा सल्ला त्यांनी दिला.
नक्की वाचा: 'दिवाळीत देशवासियांसाठी मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरुन PM मोदींची ऐतिहासिक घोषणा!
दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी कल्याणच्या जय मल्हार हॉटेलमध्ये मटण पार्टी आयोजित केली होती. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.हिंदू खाटीक समाजाच्या आंदोलनास आव्हाडांनी पाठिंबा दिला. याबद्दल हिंदू खाटीक समाजाने आव्हाड यांचे आभार मानले. आव्हाड यांनी सांगितले की, सगळ्या समविचारी पक्षांनी ठरविले याला जुमानायचे नाही. हे वाढत जाणार आहे. मुंबई- ठाणे महापालिकेने असा निर्णय घेतलेला नाही असं ही ते म्हणाले. या माध्यमातून समाजाचा नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world