कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा मिळणार अशी माहिती पुढे येत आहेत. त्यात रत्नागिरीत भाजपला एकही जागा मिळणार नाही अशी ही बातमी बाहेर आली. त्यानंतर रत्नागिरीतल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या भाजप कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठक होत आहेत. त्यामुळे कोकणात महायुतीत भूकंप होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपने युती धर्म पाळावा असे सुनावत त्यांनाच डिवचले आहे. त्यामुळे वातावरण अजून तापण्याचीही शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या रत्नागिरीत महायुतीमध्ये धुसफूस वाढली आहे. भाजपला रत्नागिरी जिल्ह्यात एकही विधानसभेची जागा मिळणार नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूण, गुहागर, दापोली, रत्नागिरीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकांचा सपाट सुरू आहे. त्यामुळे जर मतदार संघ सुटले नाहीत तर पदाधिकारी वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिं न्यूज - जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, 4 वर्षानंतर 'असं' फुटलं बिंग
एकीकडे गुप्त बैठका होत असताना रत्नागिरीत मात्र भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी स्पष्ट भूमीका घेतली आहे. रत्नागिरीकरांना परिवर्तन हवं आहे, परिवर्तनाच्या लाटेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सामील होणार आहे, असे बाळ माने म्हणाले आहेत. तसा निर्धार रत्नागिरीत भाजप पदाधिकऱ्यांचा निर्धार आहे असंही ते म्हणाले. रत्नागिरी मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत हे निवडणूक लढणार आहेत. मात्र भाजपच्या माने यांनी अशी भूमीका घेतल्याने सामंत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून ठाकरेंच्या विनायक राऊत यांना लीड मिळाले होते. ही सामंत यांच्यासाठी टेन्शनची बाब मानली जाते.
ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण योजना भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी' सरकारला थेट नोटीस
एकीकडे रत्नागिरीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होत असताना, दुसरीकडे रामदास कदम यांनाही भाजपचा विरोध कायम आहे. त्यावर कदम यांनी भाजपला छेडले आहे. गुहागर विधानसभा मतदार संघावर भाजपने दावा सांगितला आहे. त्यावर बोलताना, गुहागरच्या जागेबाबत काही लोकं सांगत आहेत, आमचाच हक्क आहे, ठीक आहे, आपण भांडायचं कशाला, गुहागरची जागा भाजपला सुटली तर आम्ही त्यांचे काम करणार. पण आम्हाला सुटली तर भाजपने युती धर्म पाळला पाहिजे असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE : नवी मुंबई विमानतळावर पहिलं विमान आज उतरणार
गुहागर विधानसभेच्या जागेवरून सध्या भाजप-शिवसेनेत चुरस आहे. याबाबत रामदास कदम म्हणाले की, गुहागरची जागा 2009 ला मी लढलो होतो. गोपीनाथ मुंडे यांनी मला ही जागा दिली होती. त्यावेळी रामदास कदम हे विरोधी पक्षनेते होते. गुहागर मतदार संघाच्या बदल्यात गोपीनाथ मुंडे यांनी बीडमधली जागा घेतली होती, अशीही आठवण ही त्यांनी या निमित्ताने भाजपला करून दिली आहे. त्यामुळे गुहागरची जागा कोणत्याही स्थिती सोडणार नाही असे संकेतच कदम यांनी या निमित्ताने दिले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - अमिताभ बच्चन यांच्या 'या' सिनेमात रतन टाटांनी गुंतवले पैसे, पण...
तर दुसरीकडे रामदास कदम यांचा मुलगा विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या उमेदवारीलाही भाजपने विरोध केला आहे. सिंधुदुर्गातही सावंतवाडी मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. इथे माजी आमदार राजन तेली हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी सेनेच्या दीपक केसरकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. शिवाय कुडा मालवण मतदार संघावरूनही पेच आहे. इथे निलेश राणे इच्छुक आहेत. पण त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढावे असे सांगितले जात आहे. पण ते भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत.