जाहिरात
This Article is From Oct 11, 2024

जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, 4 वर्षानंतर 'असं' फुटलं बिंग

ज्या मुलीवर अत्याचार झाले ती मुलगी डहाणूच्या एका शाळेत शिक्षण घेत आहे. या शाळेत ही जनजागृती मोहीत घेण्यात आली होती.

जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, 4 वर्षानंतर 'असं' फुटलं बिंग

मनोज सातवी 

अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात गेल्या काही दिवसापासून पोटच्या मुलींवरच बापाने अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार उघड झाला होता. ही घटना ताजी असताना आता पालघरच्या डहाणूमध्येही सर्वांना हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. या घटनेत नराधम बापच आपल्या अल्पवयीन मुलीचे शोषण करत होता. हे शोषण एक दोन नाही तर तब्बल चार वर्षापासून केले जात होते. मात्र भिती पोटी ही मुलगी कोणाला काही ही सांगत नव्हती. तिच्यावर होणारे अत्याचार ती सहन करत होती. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अत्याचार झालेली अल्पवयीन मुलगी ही अकरा वर्षाची होती. तेव्हा पासून हा नराधम बाप तिचे लैंगिक शोषण करत होता. मात्र त्याची कानोकान खबर कोणालाही नव्हती. त्या पिडीत मुलीनेही जिवाच्या भिती पोटी कोणालाही आपल्यावर होत असलेले अत्याचार सांगितले नाही. सध्या मुलींवर अत्याचाराच्या घटना उघड होत आहेत. या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी एक मोहिम हाती घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील शाळा कॉलेजमध्ये लैंगिक जनजागृती केली जात आहे. मुलींना सजग केले जात असून जनजागृती केली जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'श्रीमंत असून देखील...' राज ठाकरेंची रतन टाटांसाठी भावनीक पोस्ट

ज्या मुलीवर अत्याचार झाले ती मुलगी डहाणूच्या एका शाळेत शिक्षण घेत आहे. या शाळेत ही जनजागृती मोहीत घेण्यात आली होती. त्यावेळी या मुलीने तिच्या बरोबर झालेला प्रकार शिक्षकांना सांगितला. त्यानंतर तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तिची अधिक चौकशी केली. त्यात तिने गणपतीच्या सुट्टीत घरी गेली होती त्यावेळीही वडिलांनी अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. हे ऐकून पोलिसही हादरून गेले. 

ट्रेंडिंग बातमी - अमिताभ बच्चन यांच्या 'या' सिनेमात रतन टाटांनी गुंतवले पैसे, पण...

हा प्रकार आतापासूनच सुरू नव्हता. याबाबतची माहिती पिडीत मुलीने दिली. ज्या वेळी ती अकरा वर्षाची होती त्यावेळी तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार करण्यात आले. त्यानंतर हे सतत होत होते. ही माहिती पिडीतेने दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. नराधम बापाला डहाणू पोलिसांनी अटक केली आहे. त्या विरोधात गुन्हा ही दाखल केला आहे. शाळेत सुरू केलेल्या जनजागृती मोहिमे मुळे हा प्रकार उघडकीस आला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com