महायुतीसाठी टर्निंग पॉइंट ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर छगन भुजबळांनीही थेट इशारा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळू शकलं. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अर्जांची छाननी करणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी सांगितलं होतं. यासाठी काही निकषही ठरविण्यात आले आहेत. दरम्यान अजित पवार गटाच्या नेत्याने छगन भुजबळ यांनीही याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल, छगन भुजबळांचा लाडक्या नसलेल्या बहिणींना थेट इशारा दिला आहे.
नक्की वाचा - Chhagan Bhujbal:'राजकारणात मी अनेकांचे पतंग कापले, माझा पतंग...' भुजबळ असं का म्हणाले?
काय आहेत निकष?
लाडक्या बहीणींच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानुसार काही निकष ठरवण्यात आले आहेत. ज्या महिलांचं कुटुंब इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलाकडे चार चाकी वाहन आहे. त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहीणीचा लाभ घेता येणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world