जाहिरात

Chhagan Bhujbal:'राजकारणात मी अनेकांचे पतंग कापले, माझा पतंग...' भुजबळ असं का म्हणाले?

पक्षात जेष्ठ असतानाही छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं. त्यामुळे भुजबळांचा अजित पवारांनी पत्ता कट केल्याची जोरदार चर्चा होती.

Chhagan Bhujbal:'राजकारणात मी अनेकांचे पतंग कापले, माझा पतंग...' भुजबळ असं का म्हणाले?
नाशिक:

संक्रांत जवळ आली आहे. या काळात अनेक ठिकाणी पतंग उडवले जातात. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही राजकीय पतंग उडवले आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ हे नाराज आहे. त्यामुळे त्यांनी पक्षावरचा दबाव हळूहळू वाढवला होता. ऐवढचं नाही तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यांच्या दबावाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही बळी पडले नाहीत. त्यानंतर भुजबळ परदेश दौऱ्यावर गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांनी परत एकदा राजकीय फटकेबाजी सुरू केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पक्षात जेष्ठ असतानाही छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं. त्यामुळे भुजबळांचा अजित पवारांनी पत्ता कट केल्याची जोरदार चर्चा होती. भुजबळांचा बेभान होवून आकाशात उडणारा पतंग कापला गेला. याची सल भुजबळांच्या मनात आहेत. त्यातूनच त्यांनी,  मी राजकारणात अनेक वर्ष आहे. राजकारणात असताना मी अनेकांचे पतंग कापले आहेत. त्यामुळे माझा पतंग कोणी कापणार नाही असं सुचक वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य इशारा आहे की कोणाला टोला आहे याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - BJP Maha Adhiveshan:'भाजपचा विश्वासघात करण्याचं धाडस आता कोणी करणार नाही' अमित शहांनी ठणकावलं

यावेळी त्यांनी येवल्यातील जनतेचे आभार मानले. येवल्यातील जनतेने मला 20 वर्षे काम करण्याची संधी दिली आहे. शिवाय पुढील पाच वर्षे आमदारकी ही बहाल केली आहे. त्यामुळे आपण समाधाना आहे. अशा स्थितीत माझा पतंग कोणीही कापणार नाही असं ते म्हणाले. भुजबळ सध्या येवल्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आपल्या विरोधात कोणी काही बोलले नाही, त्यामुळे मी ही कोणावर बोलणार नाही. आपल्यासाठी हा विषय संपला आहे असं म्हणत त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बरोबरील वादावर पडदा टाकला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: शादी डॉट कॉमवर ओळख, लॉजवर शारीरिक संबंध , पुढे मात्र जे झालं ते...

यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ एका घरात दोन महिलांना देता येत नाही. घरात मोटार गाडी असेल तर त्यांना ही त्याचा लाभ देता येणार नाही. जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपले नावे काढावीत. नाहीतर दंडासह वसुली करण्याचे संकेत भुजबळां यांनी दिले आहेत. भुजबळांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहे. एकीकडे सरकारने सरसकट लाडकी बहीण योजनेत कोणाला बाहेर केलं जाणार नाही असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे भुजबळांनी वेगळी भूमिका मांडली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'मला माझ्या पत्नीला न्याहाळायला आवडतं'; 70 तासांच्या कामावरील आनंद महिंद्रांच्या विधानानं जिंकली मनं!

दरम्यान बीड जिल्ह्यासारखी परिस्थिती कोणत्याच ठिकाणी होता कमा नये. त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. एखाद्या जिल्ह्यात, तालुक्यात अशी परिस्थिती झाली असेल याचा अर्थ संपूर्ण राज्यात अशी परिस्थिती झाली असे नाही. आता मी शेगाव वरून आलो आहे. तिथं काही तशी परिस्थिती नाही. असेही भुजबळ म्हणाले.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com