जाहिरात

Monsoon Session: 'हे बदमाश सरकार,चहापानाला जाणार नाही', 'ही' 5 कारणं देत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा शब्द या सरकारने दिला होता. पण तसं केलं नाही असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

Monsoon Session: 'हे बदमाश सरकार,चहापानाला जाणार नाही', 'ही' 5 कारणं देत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
  • महाविकास आघाडीने महायुती सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि लाडकी बहीण योजना बंद पडण्याचा आरोप केला आहे
  • महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती असून सरकारकडे त्यासाठी कोणतीही तयारी नसल्याचा आरोप करण्यात आला आहे
  • महायुती सरकारच्या चहापानावर मविआने बहिष्कार टाकला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

पावसाळी अधिवेशन 22 जून पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मविआच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. लाडकी बहीण योजन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे तिनतेरा वाजले आहेत. महाराष्ट्रातली गुंतवणूक ही कमी झाली आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. असा स्थितीत सरकारता चहापान घेणे हे योग्य नाही. प्रत्येक आघाडीवर महायुती सरकार अपयशी ठरलं आहे अशा बदमाश सरकारचे चहापान आपण घेणार नाही असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसनेचे सतेज पाटील, राशपचे जयंत पाटील उपस्थित होते. 

महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य आहे. कायद्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कायम नंबर एकला राहिला आहे. जगात कुठलीही गुंतवणूक आली तरी महाराष्ट्रला पहिली पसंती होती. पण ही स्थिती आता बदलली आहे. त्यामुळेच आम्ही चहापानावर बहिष्कार टाकला आहे. नेहमीच्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चहापानाला निमंत्रित केले होते असं ही त्यांनी सांगितलं. मात्र त्याला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सरकारचं काम करण्याची पद्धत, वागण्याची पद्धत बदलली नाही. हा महिना पावसाचा आहे. पण अजूनही पाऊस पडला नाही. त्यामुळे सुका दुष्काळ जाहीर करावा ही आम्ही मागणी करणार आहोत असं ही ते यावेळी म्हणाले. पावसाला उशिर झाला असताना सरकारची मात्र कोणतीच तयारी नाही असं ही ते म्हणाले. 

नक्की वाचा - Revathi Sule Marriage: सुप्रिया सुळेंचे जावई सारंग लखानी कोण आहेत? वडीलांचे 'भाजप'सोबत आहे खास नातं

शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा शब्द या सरकारने दिला होता. पण तसं केलं नाही. अल्पावधीसाठी मविआचं सरकार आलं होतं. तेव्हा कर्जमाफी केली होती. त्याचा फायदा सरकारला झाला. मात्र आता कर्जमाफी करून ही ती मिळालेली नाही. त्यामुळे हे सरकार बदमाश सरकार आहे. लाडकी बहीण योजना सरकार बंद करायला निघाली आहे.कोणत्या मंत्र्याचे कुठले फोटो समोर येत आहेत हे सगळ्यांना माहित आहे असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला. या अधिवेशनात प्रत्येक मुद्द्यावर सरकारला जाब विचारणार असल्याचं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. 

नक्की वाचा - Viral Video: दुबईत फुटपाथवरून चालणाऱ्यांना काय वागणूक मिळते? दुबईतून आलेल्या तरुणीचा Video सर्व काही सांगतोय

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ही  शेतकरी कर्जमाफी झाली पाहीजे अशी मागणी केली. हे सरकार ठेकेदारांचे आहे असं ही ते म्हणाले. शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या बोकांडीवर मारला जात आहे. पेट्रोल डिझेलचा दणका सामान्य माणसाला बसत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं गणित बिघडलं आहे असं ही पाटील यावेळी म्हणाले. महायुतीचा कारभारात वाटणी कोणाला मिळणार यासाठी वाद सुरु आहेत असा दावा त्यांनी केला. गृह विभाग प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरला आहे असं ही ते म्हणाले. तर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी शेतकऱ्याची सध्याची स्थिती भीषण असल्याचं सांगितलं. पाऊस नसल्याने तो रडत आहे असं ते म्हणाले. पण सरकारला त्याचे काही एक पडले नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com