जाहिरात

महादेव जानकरांचा नवा डाव? परिषदेला वगळलं, विधानसभेसाठी नवी खेळी

विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली. जानकर यांचा पत्ता कट झाला. अशा वेळी जानकर यांनी महायुती समोर मोठी मागणी ठेवली आहे.

महादेव जानकरांचा नवा डाव? परिषदेला वगळलं, विधानसभेसाठी नवी खेळी
मुंबई:

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन केले जाईल अशी अपेक्षा होती. एकीकडे पंकजा मुंडे यांचाही लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेत केले गेले. त्यामुळे जानकरांनाही तीच अपेक्षा होती. पण त्यांच्या ऐवजी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली. जानकर यांचा पत्ता कट झाला. अशा वेळी जानकर यांनी महायुती समोर मोठी मागणी ठेवली आहे. त्यामुळे महायुतीतल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा समोर पेच निर्माण झाला आहे. जी मागणी जानकरांनी ठेवली आहे त्यामुळे गुंतागुंत वाढण्याची दाट शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महादेव जानकरांची मागणी काय? 

राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यात काही भागात ताकद आहे. आता विधान परिषदेला जानकरांना संधी देण्यात आलेली नाही. दोन वेळा आपल्याला संधी देण्यात आली होती. त्यामुळे आपण समाधानी असल्याचे जानकर म्हणाले. आता नव्या लोकांना संधी दिली पाहीजे असेही ते म्हणाले. लोकसभेला पराभूत झालो असलो तरी विधानसभा निवडणूक लढणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीत 20 जागा मिळाव्यात अशी मागणी जानकर यांनी केली आहे. त्यामुळे आधीच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच जागा वाटपा वरून रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता जानकरांनी आपली मागणी रेटली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्या समोर आता पेच निर्माण झाला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसीला नवाब मलिकांची उपस्थिती; नव्या चर्चेला उधाण

महायुती समोर मोठा पेच 

महादेव जानकरांनी परभणी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. पण त्यांना त्यात अपयश आले. जवळपास एक लाखा पेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर जानकरांचे काय होणार असा प्रश्न होता. त्यांची वर्णी राज्यसभा किंवा विधान परिषदेवर लावली जाईल अशी चर्चा होती. ते दोन टर्म विधान परिषदेवर राहीले आहेत. शिवाय फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा राहीले आहेत. जानकरांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. खास करून धनगर समाज मोठ्या प्रमाणात जानकरांच्या मागे आहे. त्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहाता जानकरांना दुखवणे भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे जानकरांना विधान परिषदेवर पाठवले जाईल अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे आता जानकरांनी नवे फासे टाकले आहेत. अशा स्थितीत महायुती समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. वीस जागांची मागणी त्यांनी केली आहे. त्यात त्यांच्या वाट्याला किती जागा येणार हे पाहावं लागणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत आता 'या' कागदपत्रांची नाही गरज

आठवले, सदाभाऊंना सत्तेत वाटा 

महायुतीतले घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा दिला आहे. रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले आहे. तर शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. दोन मित्र पक्षांना भाजपने समावून घेतले आहे. आता प्रश्न महादेव जानकरांचा आहे. त्यामुळे त्यांनी आता आपल्याला विधानसभेत मोठा वाटा मिळाला अशी मागणी केली आहे. त्यामुळे जानकरांसाठी काय द्यायचे याचा विचार महायुतीच्या नेत्यांना करावा लागणार आहे. शिवाय जानकरांना नाराज करून ही भाजपला चालणार नाही. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com