जाहिरात

अजित पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसीला नवाब मलिकांची उपस्थिती; नव्या चर्चेला उधाण

आज अजित पवारांना माध्यमांनी नवाब मलिक यांच्या बैठकीतील उपस्थिती बाबत प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं.

अजित पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसीला नवाब मलिकांची उपस्थिती; नव्या चर्चेला उधाण
मुंबई:

मविआ सरकारच्या काळात भाजपच्या आरोपानंतर नवाब मलिकांना तुरुंगात जावं लागलं होतं. अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंड पुकारल्यानंतर मलिक तुरुंगाबाहेर आले. गेल्या अनेक दिवस मलिक यांच्या कार्यालयाकडून नवाब मलिक तटस्थ असल्याचा दावा केला जात होता. पण आता हा संभ्रम दूर झालाय. 2 जुलै रोजी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत नवाब मलिक दिसले आणि ज्या नवाब मलिकांना देवेंद्र फडणवीसांनी विरोध केला होता, तो विरोध झुगारून मलिकांना अजित दादांनी पक्षात घेतलं का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान आज अजित पवारांना माध्यमांनी नवाब मलिक यांच्या बैठकीतील उपस्थिती बाबत प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं. काही त्रास होतोय का? असा प्रश्न अजित पवार यांच्याकडून पत्रकारांना विचारण्यात आला. 

महायुतीत अजित पवारांचा पक्ष आहे. अजित पवारांच्या पक्षात आता नवाब मलिक आहेत हे स्पष्ट झालंय. त्यामुळे मलिक आता महायुतीत येणार का? अशाही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी देवेंद्र फडणवीसांनी विरोध केला होता. मलिकांचा अधिकृत प्रवेश झालेला नसला तरी, अजित दादांच्या डिनर डिप्लोमसीच्या वेळी नवाब मलिक आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांचा विरोध झुगारुन अजित पवार मलिकांना सोबत घेणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.  

महाराष्ट्रात एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. यात आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देत 12 वा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे आता फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

नक्की वाचा - बालबुद्धी, शोले की मौसी... PM मोदींनी राहुल गांधींवर केलेल्या थेट हल्ल्यातील 5 प्रमुख मुद्दे

यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. वैद्यकीय कारणास्तव जामिनावर बाहेर असलेल्या माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटाच्या आमदारांच्या बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'देवगिरी' या निवासस्थानी होत आहे. या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावली आहे. इतके दिवस तटस्थ राहिलेले मलिक अजितदादा गटाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांचा महायुतीला पाठिंबा का? अशी चर्चा राजकीय गोटात जोर धरू लागली आहे.

नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाला राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती. त्यांनी त्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्यांची भेटही घेतली होती. त्यामुळे विरोधकांनी महायुतीला चांगलंच घेरलं होतं. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चक्क अजित पवारांना पत्र लिहित मलिकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह महायुतीतील एन्ट्रीला विरोध दर्शवला होता. त्यावर प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा आमदार नवाब मलिक यांच्याशी कुठलाही संबंध नाही. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्येही त्यांच्या नावाचा आणि प्रतिज्ञापत्राचा समावेश नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com