विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. 16.09 लाख नव्या मतदारांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात सर्वाधिक मतदार नोंदणी ही महिलांची झाली आहे. जवळपास 10 लाख नव महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. तर 6.8 लाख पुरूष नव मतदारांनी मतदान यादीत नोंदणी केली आहे. आता महाराष्ट्रात जवळपास 9 कोटी पन्नास लाख मतदार विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 ते 19 वयोगटातील नव मतदारांची संख्या अगदीच नगण्य आहे. एकूण मतदारांच्या दोन टक्केच मतदार हे 18 ते 19 वयोगटातील आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होवू शकते. यासाठी निवडणूक आयोगाने नव मतदारांच्या नाव नोंदणीची मोहीत उघडली होती. या मोहिनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातून जवळपास 16.9 लाख नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवले आहे. त्यामुळे 16.9 लाख मतदारांची भर पडली आहे. नाव नोंदवण्यामध्ये महिलांची संख्या ही मोठी आहे. त्यांनी यामध्ये पुरूषांना मागे सोडले आहे. नव मतदारांमध्ये दहा लाख महिलांनी आपली नोंदणी केली आहे. त्या तुलनेत पुरूषांची नोंदणी ही कमी झाली आहे. 6.8 लाख पुरूषांनी नव्याने नोंदणी केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - जोडे मारो आंदोलन, मविआचा मोर्चा पोलीस रोखणार? हुतात्मा चौकात काय स्थिती?
नव्याने एकूण मतदारांची जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार राज्यातून जवळपास 9.5 कोटी मतदार मतदानाचा अधिकार विधानसभेला बजावतील. त्यात एकूण 4.9 पुरूष मतदार आहेत. तर 4.6 कोटी महिला मतदार आहेत. तर 5 हजार 944 मतदार हे तृतियपंथी मतदार आहे. नव मतदारांमध्ये 164 तृतियपंथी यांनी नोंद केली आहे. विशेष म्हणजे एकूण मतदारांचा विचार करता पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या एकदम कमी असल्याचे समोर आले आहे. वयवर्ष 18 ते 19 असलेल्या मतदार हे एकूण मतदारांच्या फक्त दोन टक्के आहेत.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला
विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या आधी निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची मोहिम आखली होती. विधानसभेसाठी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिली होती. विधानसभेत त्याची पुनर्रावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडी उत्सुक आहे. त्यामुळे महायुतीत विरोधात रान उठवलं जात आहे. तर लाडकी बहिण योजनेच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा मानस महायुतीचा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world