गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्याचं समोर आलं आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil hunger strike suspended) यांनी उपोषण पुकारलं आहे. चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. यावेळी त्यांना चालणंही कठीण झालं होतं. दरम्यान उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं. आज सायंकाळी पाच वाजता ते उपोषण सोडणार असल्याची माहिती आहे.
मी पडून राहून उपोषण करू शकत नाही. ज्यांनी त्रास दिलाय त्यांना सरळ करणार, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. आचारसंहिता लागेपर्यंत मी राजकीय भाषा बोलणार नाही. मी कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
नक्की वाचा - Akshay Shinde Encounter : 'अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही', उच्च न्यायालय म्हणाले...
पुढे ते म्हणाले, आरक्षण नाही दिले तर सत्तेत जाऊ. मला रोज मंत्र्यांचे फोन येत आहेत. अंमलबजावणी होत असेल तर या नाहीतर येऊ नका. सलाईन घेऊन मी उपोषण करू शकत नाही, असंही ते म्हणाले. मनोज जरांगे हे नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आणि गावातील आंदोलक यांच्या मदतीने उपोषण सोडणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world