जाहिरात

124 वर्षांच्या मिंता देवी कोण आहेत? ज्यांचा फोटो असलेला टी शर्ट घालून प्रियंका गांधीसह विरोधकांनी केलं आंदोलन

Who is 124 year old Minta Devi : काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं. यावेळी सर्व खासदारांनी 'मिंता देवी' यांच्या नावाचा टी शर्ट घातला होता. 

124 वर्षांच्या मिंता देवी कोण आहेत? ज्यांचा फोटो असलेला टी शर्ट घालून प्रियंका गांधीसह विरोधकांनी केलं आंदोलन
विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या टी शर्टवर मोठ्या अक्षरात MINTA DEVI असे लिहिले होते.
मुंबई:

Who is 124 year old Minta Devi :  बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तयार केलेल्या मतदार यादी पुर्ननिरीक्षण (SIR) विरोधात विरोधी पक्ष सध्या जोरदार आंदोलन करत आहेत. मंगळवारी (12 ऑगस्ट) या मुद्यावर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं. यावेळी सर्व खासदारांनी 'मिंता देवी' यांच्या नावाचा टी शर्ट घातला होता. 

कोण आहेत मिंता देवी?

विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या टी शर्टवर मोठ्या अक्षरात MINTA DEVI असे लिहिले होते. बिहारमधील  सिवान जिल्ह्यात निवडणूक आयोगाने घाईगडबडीत आणि निष्काळजीपणे 124 वर्षांच्या एका महिलेचे नाव पहिल्यांदाच मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोप विरोधकांनी केला.या प्रकारामुळे मतदार यादी पुर्ननिरीक्षणमुळे पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 

( नक्की वाचा : Rajnath Singh : 'सबके बॉस तो हम हैं', राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर )
 

हे संपूर्ण प्रकरण दरौंदा विधानसभा मतदारसंघातील सिसवन ब्लॉकमधील सिसवा कला पंचायतीच्या अरजानीपुर गावातील आहे. येथील मतदार यादीमध्ये मिंता देवी नावाच्या महिलेचे वय 124 वर्षे नोंदवले गेले आणि त्यांचे नाव पहिल्यांदाच यादीत समाविष्ट केले गेले. मात्र, NDTV तपासणीत सत्य काही वेगळेच असल्याचं सिद्ध झालं आहे. अहवालानुसार, अरजानीपुर गावातील रहिवासी धनंजय कुमार सिंग यांच्या पत्नी मिंता देवी यांचे खरे वय फक्त 35 वर्षे आहे. ऑनलाइन फॉर्म भरताना झालेल्या चुकीमुळे त्यांचे वय 124 वर्षे नोंदवले गेले.

Latest and Breaking News on NDTV

गावातील कन्या मध्य विद्यालय, बूथ क्रमांक 94 चे बूथ लेव्हल अधिकारी उपेंद्र शाह यांनीही ही चूक डेटा एंट्रीच्या वेळी झाल्याचे मान्य केले. ऑनलाइन फॉर्म भरताना वयात त्रुटी झाली, ज्यामुळे वय 124 वर्षे दिसत आहे. ही चूक लवकरच दुरुस्त केली जाईल, असे ते म्हणाले.

असे असले तरी, विरोधकांनी हा मुद्दा संसदेत जोरदारपणे उचलून धरला. ही केवळ एकच घटना नसून, ही संपूर्ण मतदार यादी प्रक्रियेतील पारदर्शकतेचा आणि अचूकतेचा मुद्दा असल्याचा त्यांचा आरोप आहे. 

Latest and Breaking News on NDTV

अशा मूलभूत चुका होत असतील, तर त्याचा परिणाम निवडणुकीच्या निष्पक्षतेवर आणि मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर होईल, असा विरोधी खासदारांचा युक्तिवाद आहे. तर, अशा तांत्रिक त्रुटी सामान्य आहेत आणि त्या सुधारण्यासाठी एक प्रक्रिया निश्चित केलेली आहे, असं निवडणूक आयोगाचे स्पष्ट केले आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com