जाहिरात

Ravi Rana:'आमदार बनून-बनून मी त्रासलोय, आता फडणवीसांकडून 10 पट भरपाई' रवी राणा असं का म्हणाले?

आता जरी त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नसली तरी मंत्री होण्याची आस अजूनही त्यांना आहे. भविष्यात मला एकदा पुन्हा चांगली संधी मिळेल अशी आशा आहे असं ते म्हणाले.

Ravi Rana:'आमदार बनून-बनून मी त्रासलोय, आता फडणवीसांकडून 10 पट भरपाई' रवी राणा असं का म्हणाले?
अमरावती:

महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर भाजप,शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात स्थान मिळाले.पण महायुतीतल्या छोट्या पक्षांच्या वाट्याला मात्र काहीच आले नाहीत. त्यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देण्यात आला. त्यात मंत्रिपदाचे आस असलेले सदाभाऊ खोत असतील किंवा युवा स्वाभिमानचे रवी राणा असतील त्यांची झोळी रिकामीच राहीली. त्यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पण त्यांना शांत राहण्या शिवाय काहीच पर्याय नव्हता. मात्र रवी राणा यांनी आपल्या भावनांना पुन्हा एकदा वाट करून दिली आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यकर्त्यांसमोर रवी राणा यांनी मंत्रिपद न मिळाल्याने खंत व्यक्त केली. ते म्हणाले आमदार बनून- बनून मी त्रासलो आहे. मला देखील वाटतं मी मंत्री झाले पाहिजे. पण मंत्री होता आले नाही. ज्या दिवशी मी मंत्री होईन त्यादिवशी मंत्री कसा असतो हे तुम्हाला दाखवून देईन असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: धक्कादायक! मुख्याध्यापिकेने 10 वीच्या मुलींना शर्ट काढायला लावले अन् म्हणाल्या आता...

आता जरी त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नसली तरी मंत्री होण्याची आस अजूनही त्यांना आहे. भविष्यात मला एकदा पुन्हा चांगली संधी मिळेल अशी मला आशा आहे असं ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आठ दिवस आधी मला कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. शपथ घेण्यासाठी तयार रहा असा निरोपही देण्यात आला होता. पण ऐन वेळेवर मला थांबवण्यात आलं असं ही राणा यांनी यावेळ सांगितलं.  

ट्रेंडिंग बातमी - Crime news: शादी डॉट कॉमवर ओळख, लॉजवर शारीरिक संबंध , पुढे मात्र जे झालं ते...

मंत्रीपद मिळाले नाही म्हणून कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये. असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कोणतेही काम असलं तरी सांगा ते केलं जाईल. मंत्री नसलो म्हणून काय झालं आपण मंत्र्यापेक्षा कमी नाही असं म्हणाले. मंत्री जरी आपण झालो नसलो तरी  या जिल्ह्याची विकासाची दहापट भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करून घेणार आहे असं ते म्हणाले. शेवटी पुन्हा एकदा त्यांनी भविष्यात आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: