महायुतीला मिळणार मनसेची साथ? वरिष्ठ नेत्याचं सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) महायुतीला साथ देणार का? यावर सध्या खलबतं सुरु आहेत.  

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) महायुतीला साथ देणार का? यावर सध्या खलबतं सुरु आहेत. ठाण्यात महायुतीच्या मेळाव्यात याबाबत चर्चाही झाली. महायुतीच्या नेत्यांनी त्यांची इच्छा सांगितल्यानंतर या विषयावर मनसेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मनसेची भूमिका काय?

मनसेचे वरिष्ठ नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू नितीन सरदेसाई यांनी या विषयावर 'NDTV मराठी' शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. 'मनसेने स्वबळाची भूमिका विधानसभा निवडणुकीसाठी घेतली आहे त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे राज ठाकरे यांचे महाराष्ट्र दौरे सुरू आहेत. अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. 

'महायुतीमधील नेते मनसे बद्दल वाटाघाटीची जी वक्तव्य करत आहेत त्याबाबत माहिती नाही. मात्र राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. विधानसभा निवडणुकीला आम्ही स्वबळावर सामोरे जाणार आहोत मात्र पुढे काही निर्णय घ्यायचे असतील तर ते राज ठाकरे घेतील,' अशी सूचक प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. 

( नक्की वाचा : 'भावानं मागितलं असतं तर सर्व काही देऊन टाकलं असतं,' काय पक्ष आणि चिन्ह, सुप्रिया सुळेंचं उत्तर )
 

महायुतीच्या बैठकीत काय झालं?

ठाण्यात बुधवारी झालेल्या बैठकीत मनसेच्या महायुतीमधील प्रवेशाची आशा व्यक्त करण्यात आली होती. 'निवडणुकीला अजूनही वेळ आहे आणि मला याची खात्री आहे की शेवटच्या क्षणी राज ठाकरे आमच्याबरोबर येतील,' असं ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं होतं.

( नक्की वाचा : शिवबंधन सोडलं, ऑन द स्पॉट मनसेत प्रवेश, ठाकरेंच्या वरळीत काय घडलं? )
 

जागा वाटपाच्या मुद्द्यावर आमचे तीनही नेते राज ठाकरे यांच्याशी बोलत आहेत,विकासाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आमच्याबरोबर येतील अशी आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रसाद लाड यांनी दिली होती.

Advertisement

मनसेचे 4 उमेदवार जाहीर

विधानसभा निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी मनसेचे 4 उमेदवार जाहीर केले आहेत.  शिवडीतून बाळा नांदगांवकर,पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे आणि हिंगोलीतून  प्रमोद कुटे या उमेदवारांच्या नावांची घोषणा आत्तापर्यंत करण्यात आली आहे.