
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीत खटके उडताना दिसत आहेत. या योजनेचे श्रेय घेण्याची स्पर्धाच महायुतीतल्या तीन ही पक्षात लागली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गट कमालीचा नाराज झाला आहे. त्यांनी आपली नाराजी जाहीर पणे व्यक्त केली आहे. या योजनेची जी जाहीरात घटकपक्षाकडून केली जात आहे त्यातील मुख्यमंत्री हा शब्द गायब झाला आहे. मुख्यमंत्री हा एक शब्द टाकणे जड झाले आहे का? अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी मित्रपक्षांना सुनावले आहे. देसाई यांची ही नाराजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत आहे. भाजपनेही या योजनेची जोरदार जाहीरात केली आहे. त्यावर फक्त देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. यासर्व घडामोडींमुळे महायुतीत खटके उडत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिंदे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एखादी योजना सरकारच्या माध्यमातून आणली जाते. ती योजना लोकप्रिय होते. त्यामुळे ती योजना कोणा मुळे आली याची चर्चा होते. दहा वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली होती. त्यातून गावागावात रस्ते झाले. युती सरकारमध्ये ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली होती. या योजना लोकप्रिय झाल्या. पण त्यांची नावे कधी बदलली गेली नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.
ट्रेंडिंग बातमी - रामदास कदमांची भाषा बदलली, महायुतीबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले जे चुकले ते...
या योजनेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे नाव ठेवण्यात आले आहे. सर्वांच्या सहमतीने हे नाव ठेवण्यात आले आहे. असं असतानाही एक बाब शिवसेना शिंदे गटाला खटकली असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की आमच्या मित्र पक्षाने जाहीरात करताना मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे. हा एक शब्द जाहीरातीत टाकणे हे काय जड नव्हते ना, असे ते म्हणाले. आम्ही सगळे जण महायुती म्हणून काम करत आहोत. पण जे ठरलं आहे. जे नाव आहे. त्याचे जीआर आहेत. त्याचे तंतोतंत पालन केलं पाहीजे. शिवसेना म्हणून त्याचे पालन केले जात आहे. असे देसाई म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंचा नवा डाव, मुंबईत 22 जागांवर लढण्याची तयारी... वाचा संभाव्य यादी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे राज्यभर कार्यक्रम घेतले जात आहेत. त्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सामावून घेतले जात आहे. जाहीरातीवर त्यांचेही फोटो लावले जात आहे. शिवसेना युतीचा धर्म पाळत आहे. मात्र आमचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून त्याचे पालन होताना दिसत नाही असा आरोप देसाई यांनी केला आहे. राष्ट्रवादीने आपल्या प्रचारात जे बॅनर बनवले आहेत त्यातून मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आला आहे. त्याबाबत देसाई यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आपण अजित पवारां बरोबर बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - भाजपनंतर राष्ट्रवादीतही खडसेंना नो एन्ट्री? रोहिणी खडसेंचाही पत्ता कट होणार?
सध्या लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीरात करण्यात येत आहे. त्यात दादाचा वादा माझी लाडकी बहीण योजना अशी जाहीरात केली आहे. सध्या अजित पवारांची जनसन्मान यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. या यात्रे दरम्यान ही जाहीरात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादी प्रमाणे भाजपने ही राज्यातल्या काही भागात जाहीरात केली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांना फोटो गायब झाला आहे. त्यामुळे आता या योजनेतील मुख्यमंत्री या शब्दावरून महायुतीतच वाकयुद्ध रंगले आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world