BJP Murugan Selvan Latest News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाने मुरूगन सेल्वन यांची भाजपच्या मुंबई दक्षिण विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपच्या मुंबई विभागात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपने मुरूगन यांनाही पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे. मुरूगन हे मूळचे तामिळनाडूचे रहिवासी असून ते सध्या मुंबईत राहतात. उद्योगपती मुरूगन यांची नियुक्ती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केली. दरम्यान, सेलवन यांच्या नियक्तीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपने नियुक्ती केल्यानंतर मुरूगन सेल्वन यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार, तसच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची भेट घेतली. यावेळी शेलार आणि साटम यांनी मुरूगन यांना शुभेच्छा दिल्या.मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील तमिळ समाजाच्या विविध उपक्रमांत मुरूगन यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवला आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार? 'त्या' एका बॅनरमुळे राजकीय उलथापालथ होणार
आशिष शेलार,अमित साटम यांसारख्या नेत्यांशी जवळचे संबंध
या परिसरात भाजपला बळकटी देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.विशेष म्हणजे, मुंबईतील तमिळ संस्थांचे आणि भाजप नेतृत्वाचे दुवा म्हणून त्यांनी सातत्याने कामकाज पाहिलं आहे. आशिष शेलार आणि अमित साटम यांसारख्या प्रमुख नेत्यांशी त्यांचे जवळचे राजकीय संबंध असल्याचं बोललं जातं.