'लवकरच नमक हराम - 2 काढणार' संजय राऊत यांची ठाण्यात घोषणा

Sanjay Raut Speech : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात सभेत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.

Advertisement
Read Time: 2 mins
S
ठाणे:

'सध्या ठाण्यातील लोकं फार सिनेमा काढत आहेत.  हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्यूसर झालेत? मलाही सिनेमा काढायचा आहे. नमकहराम 2 हा सिनेमा मला काढायचाय. माझ्याकडं स्क्रीप्ट तयार आहे. अमिताभ-राजेश खन्ना यांचा एक नमकहारम आला होता. नमक हराम 2 चा स्क्रिप्ट तयार आहे.  असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये ते बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ठाण्याचं नाव या गद्दारांनी मातीत मिळवलं आहे. या ठाण्यात अनेक महान लोकं होऊन गेली. बाळासाहेब ठाकरेंनतर ठाणे हे कडवट, निष्ठावान आनंद दिघेंच्या नावानं ओळखलं जात होतं. ते या गद्दारांनी नमकहरामांनी संपूर्ण देशात बदनाम केलं आहे. 

पैसे आहेत म्हणून एकदा लोकसभेत जिंकलात. हे मिंधे पैशांशिवाय कधी जिंकूच शकत नाही. यांच्या रक्तात लबाडी आहे, अख्या महाराष्ट्रात त्यांनी लबाडी केली.  ती लबाडी कशी केली हे राजन विचारे यांनी सांगितलं. त्यामुळे आता आपल्याला सावध राहिलं पाहिजे. 

ह्यांनी लाडकी बहीण ही घोषणा केली आहे, ठाण्यात किती बहिणींचे संसार यांनी उद्धवस्त केले ते सांगा असा सवाल करत जे निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिले त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवले असा आरोप राऊत यांनी केला. 

( नक्की वाचा : 'मराठवाड्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न', राज ठाकरेंचा गंभीर आरोप! पवार, उद्धव यांना सुनावलं )

मेळाव्यात मनसैनिकांचा राडा

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या या मेळाव्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ठाकरे मेळाव्यासाठी गडकरी रंगायतन इथे पोहोचले, त्याच वेळी मनसैनिकांनी एकच गोंधळ केला. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणाचे गोळे फेकण्यात आले. त्यानंतर बांगड्याही फेकण्यात आल्या. काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना त्यावेळी रोखले. यावेळी गडकरी रंगायतन बाहेर जोरदार गोंधळ झाला. 

Advertisement

( नक्की वाचा : 'दक्षिण आफ्रिकेतील घोटाळेबाजांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा' )

राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडी समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. शिवाय त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही असेच काही तरी होणार अशी शक्यता होती. तसा इशाराही मनसे नेत्यांनी दिला होता.