जाहिरात

मोठी बातमी! नरहरी झिरवाळांचे पुत्र शरद पवारांच्या मंचावर, चर्चांना उधाण

अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! नरहरी झिरवाळांचे पुत्र शरद पवारांच्या मंचावर, चर्चांना उधाण
दिंडोरी:

विधानसभा निवडणुकीची सर्वच जण तयारी करत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. तर इच्छुक उमेदवार कुठे जायचं याची चाचपणी करत आहे. अशा वेळी आणखी एक मोठी घडामोड राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नरहरी झिरवाळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा होती. शिवाय लोकसभेलाही नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार गटाचेच काम केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आता त्यांचे पुत्र थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर दिसले आहेत. गोकुळ झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना लोकसभा निवडणूकही लढवायची होती. पण अजित पवार गटाकडून त्यांना शक्य नव्हते. आता विधानसभेसाठी गोकुळ हे इच्छुक आहे. त्यामुळेच ते शरद पवारांच्या मंचावर दिसल्याचे बोलले जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Budget 2024 Live Updates : नव्या कर प्रणालीनुसार 'टॅक्स स्लॅब'मध्ये बदल

दिंडोरीमध्ये शरद पवार गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. यावेळी नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ यांनीही हजेरी लावली. ते व्यासपीठावरही दिसले. निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा असे मेळाव्याचे नाव ठेवण्यात आले होते. यावेळी गोकुळ यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे काही दिवसात नरहरी झिरवाळही शरद पवार गटात येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. गोकुळ यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढायची आहे. ते दिंडोरी मतदार संघातून इच्छुक आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - '... तर आम्ही अर्थसंकल्पाचे स्वागत करू' राऊत असे का म्हणाले?

दिंडोरी विधानसभा मतदार संघाचे सध्या नरहरी झिरवाळ हे प्रतिनिधीत्व करतात. झिरवाळ हे लागोपाठ दोन वेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. मात्र यावेळी या मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा त्यांच्या मुलानेच व्यक्त केली आहे. मात्र ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडूक लढण्यास इच्छुक आहेत. तर नरहरी झिरवाळ हे सध्या अजित पवार गटात आहेत. त्यामुळे मुलगा वडीलां विरोधात निवडणूक लढवणार? की मुलासाठी वडील शरद पवारांकडे पुन्हा येणार याची चर्चा सुरू झाली आहे.   


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com