जाहिरात

'काका मला वाचवा म्हणणारे आता दादा मला वाचवा असं म्हणतायत'

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रु नसतो. त्यामुळे येणाऱ्या काळात खरोखर काका आणि पुतण्या एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'काका मला वाचवा म्हणणारे आता दादा मला वाचवा असं म्हणतायत'
पुणे:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर हे दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र येणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यात दिल्लीत अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. त्या आधी विधानसभेत जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं सुचक वक्तव्य केलं होतं. त्यात अजित पवार गटाच्या आमदाराने एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना चिमटा काढला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पवार काका पुतणे एकत्र येणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार पणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत काही जण काका मला वाचवा अशी टीका अजित पवारांवर केली जात होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यांचाच सुर बदलेला दिसतोय असं अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके म्हणाले. काका मला वाचवा म्हणणारेच आता दादा मला वाचवा असं म्हणत आहे असं ही शेळके यावेळी म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - सावरकर ते द्रोणाचार्य! संविधानावरील चर्चेतून राहुल गांधींकडून भाजपची कोंडी

दादा मला वाचवा अशी स्थिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांची झाली आहे. त्यांना आता अजित पवारांचा आधार वाटत आहे असंही ते यावेळी म्हणाले. मात्र अजित पवारांच्या संकट काळात जे पुढे होते. ज्यांची मदत झाली त्यांना बरोबर घेतलं जाईल. शिवाय जर राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार असेल तर आनंदच आहेत. पण त्यातही अजित पवारांना साथ देणाऱ्यांनाच घेतलं जाईल असंही ते म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - सहलीला म्हणून आली अन् प्रियकरासोबत पळाली, पण पुढे जावून 'अशी'अडकली

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे परत एकत्र येणार या चर्चेला जोर धरत आहे. त्यात आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले तर आनंदच आहे. त्यांनी एकत्र यायला पाहीजे. कार्यकर्त्यांचीही ती भावना आहे असं वक्तव्य त्यांनी केल होतं.  असं असलं तरी दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांची त्यासाठी खरोखरच तयारी आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रु नसतो. त्यामुळे येणाऱ्या काळात खरोखर काका आणि पुतण्या एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: